पालघर मध्ये महासंस्कृती महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनाचे शुभारंभ…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- 11 फेब्रुवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सिडको मैदान, कोळगाव येथे आयोजन

नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवामध्ये सहभागी व्हावे

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे आवाहन

पालघर दि. 07 फेब्रुवारी 2023 रोजी पासून महासंस्कृती महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या समृद्ध इतिहासाला उजाळा देण्यासाठी ऐतिहासिक वस्तूच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.

जिल्ह्यामध्ये महानाट्य आणि महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधी मध्ये सिडको मैदान,कोळगावं येथे करण्यात  येणार आहे.

महानाट्य आणि महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार संजय केळकर जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर,तहसीलदार श्री.भालेराव तसेच पत्रकार,आणि नागरिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त तसेच त्यांच्या जिवनावर आधारीत त्यांचे विचार महानाट्याद्वारे जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महानाट्याचे आयोजन तसेच राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे अदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, कला व संस्कृतीचे जतन संवर्धन आणि स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात , अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा जिल्ह्यातील नागरीकापर्यंत पोहचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव व महानाट्याचे आयोजन 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार असल्याचे श्री.निकम यांनी सांगितले .

महासंस्कृती महोत्सवामध्ये दु.4ते 6 या वेळेमध्ये पालघर परिसरातील शाळा महाविद्यालयांचे सांस्कृतिक कार्यक्रम सिडको मैदान, बोईसर रोड येथे आयोजित करण्यात येणार आहे . ठाणे येथील प्रेरणा कला संस्था यांनी ‘शिवबा नाट्य’ सादर केले .एक संगीत संध्या ही संस्था ‘शिवराय’ हे नाट्य दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सिडको मैदान,कोळगावं येथे सादर करणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे हि आवाहन श्री.निकम यांनी केले आहे..

कला संस्था यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

एक संगीत संध्या ही संस्था ‘शिवराय’ हे नाट्य दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करणार आहे. प्रतिभा आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था ‘महाराष्ट्र दर्शन’ हा कार्यक्रम दि. 10 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करणार आहे. नार्थ रे मेडिया प्रा. लि. ही संस्था लोकरंग हा कार्यक्रम दि. 11 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करेल, मुंबई येथील जनजागृती समाज प्रबोधन कार्य ही संस्था ‘वारसा संस्कृतीचा’ हा कार्यक्रम दि. 11 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 10 या वेळेत सादर करेल.

तसेच या महोत्सवांमध्ये ऐतिहासिक वस्तूचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विरार येथील कलाकृती इन्व्हेंट कंपनी ही संस्था ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन, मोडी लिपीतील पत्रांचे प्रदर्शन तसेच ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन दि. 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत आयोजन करणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट