महाड एमआयडीसी प्रदीप शेटे केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक…!

0
Spread the love

उपसंपादक : राकेश देशमुख

महाड :-महाड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये सतत विविध प्रकारच्या घटना घडत आहेत.

महाड एमआयडीसीतील प्रदीप शेटे केमिकल कंपनीला भीषण आग लागली या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून कोणत्याही प्रकारची जीवित हानी मात्र झाले नाही.

घटनास्थळी पोलीस प्रशासन, प्रांताधिकारी, तहसीलदार , अग्निशामक दल पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आली, जळून खाक झालेल्या कंपनी समोरील डिफ्लॉन कंपनी व्यवस्थापकांनी मास्क, हेल्मेट, पाणी या प्रकारच्या अनेक मदत कार्य केले.

आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत सविस्तर माहिती महाड उपविभागीय अधिकारी श्री शंकर काळे यांनी सुरक्षा पोलीस टाइम्स न्युज चॅनलवर दिली आहे.

महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कंपनी मालक प्रदीप सखाराम शेटे, पार्टनर कैलास पाटील, कंपनी प्रोडक्शन मॅनेजर महादेव बिरजे, कंपनी मेंटेनन्स हेड प्रदीप जैस्वाल, ठेकेदार संजय साळुंखे यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट