नाशिकरोड पोलीसांनी एका गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणाऱ्यास २४ तासात ठोकल्या बेडया …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नाशिक:- फिर्यादी नामे जसबीर सिंग अमरीक सिंग वय ७१वर्षे, व्यवसाय-ट्रान्सपोर्ट, रा. आनंद निवास, नाशिक पुणा हायवे, आर्शीवाद बस स्टॉप, गुरुद्वारा जवळ, दत्तमंदिर, नाशिकरोड, नाशिक यांच्या सुभाषरोड येथील खताच्या गोडाउन मध्ये चोरी झाल्याने नाशिकरोड पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ५७/२०२४ भादवि कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोहवा / १८०८ टेंमगर हे करत होते. सदर गुन्हयात आरोपीचा शोध घेउन चोरीस गेलेला मालाचा शोध घेणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रामदास शेळके यांनी आदेश दिले होते.

नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने पोहवा / १८०८ टेमगर व गुन्हे शोध पथकचाचे अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करत असतांना गुन्हे शोध पथकाचे पोशि/ २०४ अरुण गाडेकर यांना गोपनीय बातमीदार मार्फतीने माहिती मिळाली कि, सुभाषरोड येथील गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणारा इसम हा माल धक्का येथे असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच मालधक्का, देवळाली गाव येथे जाउन नमुद इसमास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव आकाश रामचंद्र चिकने वय २९वर्षे, रा. रमाबाई आंबेडकरनगर, मालधक्कारोड, गुलाबवाडी, नाशिकरोड, नाशिक असे सांगितल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथिदारांसह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास नमुद गुन्हयात अटक करून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे

१) १,८३,२९८/- रूपये किंमतीच्या ७४ किशक भारती डी. ए. पी. ५० किलो वजनाच्या (एक डी. ए. पी गोणीची मुळ किंमत २४७७ रूपये)

२) ८,००,०००/- रू किं. अंदाजे या एक महींद्रा कंपणीचा FURIO 14 आयशर ट्रक क MH 15 GV 4146 सफेद पट्टा असलेला चॉकलेटी रंगाचा असलेला जुयाकिंअ. ९,८३,२९८/रू. एकुण

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णीक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ श्रीमती मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेळके, श्री. पवन बौधरी पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोहवा /१८०८ विजय टेमगर, पोहवा / ८३० विष्णु गोसावी, पोना/५०५ बच्चे, पोशि /१९५० सागर आडणे, पोशि/२३८१ गोकुळ कासार, पोशि/२२६० रोहित शिंदे, पोशि/२०४ अरुण गाडेकर, पोशि/२०७२ मनोहर कोळी, पोशि/५४ नाना पानसरे, पोशि/१५४२ यशराज पोतन, पोशि/२१७१ संतोष पिंगळ, पोशि/२५५० भाऊसाहेब नागरे चापोशि/५५४ रानडे, पोशि/ २२५५ कल्पेश जाधव अशांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट