स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करून ७ मोटरसायकली केल्या जप्त…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:– पालघर जिल्ह्यामध्ये मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हेशाखा पालघर यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक अनिल विभूते साहेब यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पो.उपनीय स्वप्निल सावंत देसाई / पोहवा / 937 संदीप सरदार पोहवा. / 1576 कैलास पाटील पोहवा./ 1681 दिनेश गायकवाड पोहवा./ 226 राकेश पाटील पोहवा./ 326 संजय धांगडा सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे पथक बोईसर पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करिता रवाना केले. डहाणू पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 16/2024 भादंविस कलम 379 प्रमाणे अज्ञात आरोपीकडून मोटरसायकली चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी

(1) विधी संघर्षित बालक वय 17 वर्ष

(2) विधी संघर्षित बालक वय 17 वर्ष

(3) विधी संघर्षित बालक वय 17 सर्व राहणार साई लोक नगर. गणेश नगर बोईसर जिल्हा पालघर असे मिळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबुली केले.

तसेच मे 2023 व ऑगस्ट 2023 मध्ये डहाणू रेल्वे स्टेशन येथून एक होंडा कंपनीची सीबी साईन मोटार सायकल क्र.MH48BU347 व हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटर सायकल क्र.MH48W3054 या चोरी केल्याचे तसेच एक रेडमी कंपनीचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे विधी संघर्षित बालके 1/2 यांच्यासह विधी संघर्षित वय 16 वर्ष 8 महिने यांनी सफाळे परिसरातून

(1) हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल क्र.MH04EA4036

(2) होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटर सायकल क्र.MH48AR3074

(3) हिरो होंडा कंपनीचे स्प्लेंडर मोटर सायकल क्र.MH48AD4592 अशा 3 मोटरसायक चोरी केल्याचे कबुली केली आहे वरील मोटरसायकल पैकी MH04EA4036 ही विधी संघर्षित बालके वय 16 वर्षे 8 महिने याच्या कडे ठेवून इतर दोन मोटरसायकल क्र.MH48AD4592 व MH48AR3074 या अनुक्रमे

(1) गुलशन कुमार जनार्दन गोस्वामी वय 21 वर्षे रा. साई लोकनगर. शिव मंदिराजवळ बोईसर ता. जि.पालघर मूळ रा. ग्राम.जमूई पो. खैरा.ता जुमई राज्य बिहार

(2) यशवंत लक्ष्मण गोस्वामी वय 23 वर्षे रा. साई लोकनगर शिव मंदिराजवळ बोईसर ता. जि. पालघर मूळ रा. ग्राम. जितपुर बकरी बाजार ता. जि. बेगुसराय राज्य. बिहार यांना विकल्याचे सांगितले त्यामुळे मोटर सायकल विकत घेणारे आरोपी यांचा शोध घेतला असता ते मिळून आले असून त्यांनी सदरच्या मोटर सायकल ह्या अप्रमाणिकपणे स्वीकारल्याचे कबुली केले आहे त्यामुळे सफाळा पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हे उघडे झाले आहेत डहाणू व सफळा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व एकूण 7 मोटरसायकल व एक मोबाईल असा एकूण 100% मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई डहाणू व सफळा पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे.

सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोनि. अनिल विभूते साहेब पालघर पोउपनी. / स्वप्निल सावंतदेसाई पोहवा. / संदीप सरदार पोहवा. / कैलास पाटील पोहवा./ दिनेश गायकवाड पोहवा./ राकेश पाटील व पोहवा./ संजय धांगडा सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोशी./ अक्षय शेट्टे पोशी./ वाल्मीक पाटील नेमणूक सायबर पोलीस ठाणे पालघर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट