उमदी पोलीसांनी गोळीबार करुन जिवे मारण्याचे गुन्हयातील मुख्य आरोपीस केला गावठी पिस्टलसह अटक..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :- गुरनं ३/२४ भादंवि क ३०७, ५०४, ५०६ सह भा. शस्व अधि. क ५, २७ प्रमाणे
फिर्यादी पापण्णा रतनसिंग लमाणी, वय ४२, व्यवसाय शेती, रा. कागणरी, ता. जत, जि.सांगली
गु.घ.ता वेळ २४.१२.२०२३ रोजी
गु.दा.ता वेळ ०४.०१.२०१४ रोजी
गोपनीय बातमीदारामार्फत सपोनि संदीप शिंदे, उमदी पो. ठाणे
कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत सुनिल साळुंखे सर यांचे मार्गदर्शानाखाली सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, पोना मासाळ, पोकों घोदे, पोकों कुमरे, चापोकों सोपान भंडे, आप्पाहेब घोडके, सुदर्शन खोत
आरोपीचे नाव पत्ता प्रकाश तुकाराम लमाणी, रा. कागणरी, ता. जत, जि. सांगली.
ताब्यात दिनांक २३.०१.२०२४ रोजी
गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१५,०००/- रु. किंमतीचे ०१ देशी बनावटीचे गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) १५,०००/- रु. असा (एकुण पंधरा हजार रु. फक्त)
हकीकत
दि.२४.१२.२०२३ रोजी उमदी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कागणरी, ता. जत, जि. सांगली येथील रहिवासी असलेले पापण्णा रतनसिंग लमाणी हे त्यांचा मुलगा अभिजीत याचे सोबत त्यांचे सासरे जयराम लमाणी यांचे शेतामध्ये ऊसतोड सुरु असल्याने शेताजवळ असलेल्या सामाईक रस्त्यावर बोलत उभे असताना तुकाराम धनसिंग लमाणी यांचा लहान मुलगा प्रकाश तुकाराम लमाणी हा जोराने चालत आला व त्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा अभिजीत याचेशी मागील भांडणावरून शिवीगाळ करुन धमकावण्यास सुरुवात केली.
भांडणा दरम्यान आरोपी प्रकाश लमाणी याने त्याचेजवळील अवैध गावठी पिस्टलने फिर्यादी यांचा मुलगा अभिजीत यास जिवे मारण्याचे उद्देशाने गोळी झाडली होती.
सदर घटनेमध्ये फिर्यादी यांचा मुलगा अभिजीत याचे डाव्या पायाचे मांडीत गोळी लागुन तो जखमी झाला होता.
जखमी यांचेवर विजापूर येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यात आला आहे. गुन्हा
पडल्यापासुन यातील पाहिजे आरोपी प्रकाश लमाणी हा गुन्हयात वापरलेल्या हत्यारासह फरार होता व मिळून येत नव्हता. सदर गुन्हयाचा तपास सपोनि संदीप शिंदे उमदी पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात आला आहे.
मा. पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली सर, मा. अपर पोलीस अधिक्षक, सांगली श्रीमती रितु खोखर व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी जत, श्री सुनिल साळुंखे यांचे सुचनांप्रमाणे ०२ पथके कनार्टक व महाराष्ट्र राज्यात विवीध ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आलेली होती.
दि.२३.०१.२०२४ रोजी सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी प्रकाश लमाणी हा त्याचे नातेवाईकांना भेटण्यासाठी गावी येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस ठाणेकडील स्टाफसह तात्काळ कागणरी येथे जावून मिळाले चातमीप्रमाणे आरोपीस ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून त्याने सदर गुन्हयात फायरींग करुन जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेले अवैध गावठी पिस्टल हत्यार जप्त करण्यात आलेले आहे.
आरोपी प्रकाश लमाणी यास अटक करुन मा. न्यायालय समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीची ०४ दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि संदीप शिंदे, उमदी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com