महाड कुसगाव बौद्धवाडी येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी गुन्हे दाखल..

0
Spread the love

उपसंपादक: राकेश देशमुख

महाड :- 25 जानेवारी रोजी महाड तालुक्यातील कुसगाव बौद्ध वाडी येथे दोन गटामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये फिर्यादी व आरोपी हे एकाच गावात एकमेकांचे शेजारी राहत असून पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सविस्तर माहिती अशी की फिर्यादी प्रियंका सचिन धोत्रे वय 38 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धोंडीराम किसन शिर्के व अनिता धोंडीराम शिर्के यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या पाठीवर लाकडी काठीचा जोरात फटका मारून त्यांना मोठी दुखापत केली आहे यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता धोंडीराम शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यातील आरोपी यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना हाता बुक्क्याने मारहाण तसेच त्यांची अल्पवयीन मुलगी हिला देखील पायावर काठी मारून जखमी करण्यात आले आहे याप्रकरणी प्रणिता विश्वास शिर्के, श्रद्धा श्रीधर शिर्के, रंजना पांडुरंग धोत्रे, संध्या अनिल जाधव, प्रगती सुमित धोत्रे, प्रियंका सचिन धोत्रे, अनिता रुपेश शिर्के, विभा विजय शिर्के सर्व राहणार कुसगाव बौद्धवाडी अशा आठ जणांविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. व्ही.जाधव व पोलीस नाईक पी.पी. शास्त्री हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट