बार्शीत पोलीस जाणीव संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
सोलापूर:– आज 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार, तसेच बार्शी तालुका अध्यक्ष श्रीसम्मेद तरटे यांच्या सूचनेनुसार,आज बार्शी तालुका सौंदर्य येथे नवनाथ वारकरी शिक्षण संस्था सौंदर्य या ठिकाणी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने तेथील वारकरी संप्रदायिक मुलांच्या शाळेत भेट दिली.
तसेच त्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि तेथील मुलांना संघाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेचे प्रमुख केदार राहुल शिंदे सर तसेच वैभवी साखरे मॅडम यांनी पोलीस जाणीव सेवा संघाचे कौतुक करून आभार मानले. तसेच सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी शिंदेसर हे म्हणाले की पोलीस जाणीव सेवा संघाचे कार्य अतिशय उत्तम आहे आणि हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी शहर अध्यक्ष कौशल्याताई राऊत, उपाध्यक्ष भाग्यश्रीताई बोंडवे,पूजाताई पुरी, कासारवाडी शाखेचे सहाकर्याध्यक्ष चंद्रकांत कदम, सचिव गणेश शिंदे, रविराज तुंगतकर,अविनाश पाचंगे, तुषार भिसे, विशाल भिसे, अक्षय गायकवाड, विश्वनाथ पोकळे आदी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com