काँग्रेस पक्षाचा डिजिटल सदस्य नोंदणीकरिता मंडणगड तालुक्यात रचनात्मक नियुक्त्या..!

0
Spread the love

प्रतिनिधी-सायली मळेकर

मंडणगड : दिनांक15 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. नाना पटोले यांनी पूर्ण राज्या मध्ये ” डिजिटल सदस्य नोंदणी ” करणे बाबत, कोकण विभागाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष/ब्लॉक अध्यक्षांची झूम मिटिंग आयोजित करून पक्षाचे जास्तीत- जास्त सदस्य नोंदणी करणे कामी आदेश दिले आहेत.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्लॉक अध्यक्षांच्या मार्गदर्शना खाली एक मुख्य इनरोलर व प्रत्येक जिल्हापरिषद गटा करिता एक इनरोलर ची नियुक्ती करणे बाबत सूचना केली आहे.

त्याप्रमाणे मंडणगड तालुक्यातील सौ. अस्मिता ताई केंद्र यांची मंडणगड तालुक्याच्या मुख्य इनरोलर ,

पणदेरीतील श्री जमीर भाई माखजनकर यांची जि. प. गट क्र.१ शिरगाव करिता इनरोलर

श्री संतोष जी मांढरे यांची जि. प. गट क्र. २ उमरोली करिता इनरोलर

व मंडणगड नगरपंचायत क्षेत्रा करिता कुमार प्रतीक शेट्ये यांची इनरोलर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यानंतर काही दिवसातच वरील नियुक्त चारही पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली प्रत्येक बूथवर एक महिला व तीन पुरुष यांची नियुक्ती करून डिजिटल सदस्य नोंदणी कार्यक्रम पूर्ण तालुक्यामध्ये सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले.

तरी तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांनी आपल्या बूथ वरील जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणे करिता त्यांची नावे, पत्ते, मतदान ओळखपत्राचा क्रमांक,फोटो व मोबाईल क्रमांक तयार ठेवण्याबाबत सूचना कराव्या व डिजिटल सदस्य नोंदणी कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मा.श्री अविनाश जी लाड साहेब , तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, मुख्य इनरोलर सौ अस्मिता ताई केंद्रे, इनरोलर श्री जमीर माखजनकर , इनरोलर श्री संतोष जी मांढरे व इनरोलर श्री प्रतीक शेट्ये यांच्यावतीने करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट