मौजमजेसाठी रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस अटक करुन २ रिक्षा भारती विद्यापीठ पोलीसांनी केल्या जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याचाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणून पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अनिल भोसले, हर्षल शिंदे यांना कात्रज स्मशान भूमीजवळ एक इसम चोरीची रिक्षा घेवून थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज स्मशान भुमी येथे गेले असता तेथे इसम नामे सादीक अलताफ शेख, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर ०१, भराडे वस्ती, आशीयाना हाईटस, चौथा मजला, येवलेवाडी, पुणे हा त्याचे ताब्यात रिक्षा क्रमांक एम.एच./१२/क्यु आर./३०५८ हिच्यासह मिळून आला.

सदर रिक्षाबाचत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४१/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक २२/०१/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे केले तपासावरुन त्याचेकडून ३,००,०००/- रुपये किंमतीच्या दोन रिक्षा जप्त करुन खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०/२०२४, भादंवि कलम ३७९

२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४४१/२०२३, भादंवि कलम ३७९

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा.नंदिनी यन्याणी सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) गिरीशकुमार दिघावकर, पोलीस उप निरीक्षक थिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अनिल भोसले, हर्षल शिदे, धनाजी धोत्रे, बापु भिंगारे, विठ्ठल चिपाडे, मिलींद गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधय, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चीधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट