विळे वरचीवाडी सिद्धिविनायक सोसायटी कडून शेतकऱ्यांना करावा लागतोय सांडपाण्याचा सामना….

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

रायगड : माणगांव:-माणगांव तालुक्यातील विळे येथील असणारे मौजे वरची वाडी सिद्धिविनायक सोसायटी ही इमारत सण 2012-2013 यां वर्षांमध्ये बिल्डर प्रकाश वसंत काने यांनी बांधलेली असून सदर इमारतीच्या पश्चिम दिशेस शेत जमीन आहे यां भात शेतीमध्ये शेतकरी अर्जुन तुकाराम आंबेतकर हे पावसाळी भात हे उत्पन्न आजतायात घेत असून हिवाळी हरभरा, वाल, मूग, मटकी चवळी अशे अनेक कडधान्य स्वरूपात पीक घेत आहेत.

तसेच यां शेतकऱ्यांनी त्याच्या भातशेतीसाठी पूर्वपार वाडा शेतघर बांधलेले आहे. त्याचबरोबर आंबा, केली काजू फणस चिकू पेरू अशी फळझाडे तसेच विविध फुलझाडे लावली आहेत इतवर परिस्थिती असताना सदर सोसायटीचे बांधकाम नमूद कॉन्टॅक्टर प्रकाश काने यांनी शेत जमिनीच्या साईड नी संरक्षण भीत बांधून देऊ तसेच इमारतीमधील निघणारा घन कचरा गटार साडपाणी सौचालयांचे घाण पाणी तसेच इतर घाण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येणार नाही अशी ग्वाही दिली होती.

सदर इमारतीचे बांधकाम सण 2015 मध्ये पूर्ण झाल्यानंतर नमूद इमारतीमध्ये राहण्यास आलेले सोसायटी पदाधिकारी व सदस्य संपूर्ण धारक यांनी देखील कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही असे शेतकऱ्यांला सांगितले होते. परंतु इमारतीच्या सौचालय व साडपाणी यांकरिता बांधण्यात आलेल्या जमिनीतील टाक्या निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यामुळे सदर साडपाण्याच्या टाक्याचे सौचालय घाण तसेच साडपाणी भात शेती लागवडीमध्ये जात आहे त्याच प्रमाणे सोसायटी धारक त्याचा सुका कचरा दारूच्या बॉटल इमारतीचा संपूर्ण कचरा शेती मध्ये फेकत असल्याचे सांगत आहेत यावर लवकरात लवकर सोसायटी धारक व बिल्डर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करावी अशे शेतकरी अर्जुन आंबेतकर बोलत आहेत.

कारण मागील काही महिन्यात सोसायटी अध्यक्ष सचिव यांना बेकायदेशीर कृत्य थांबवीत नसल्यामुळे माहितीगार वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली होती परंतु त्या नोटीसिस कोणतेही प्रकारचे उत्तर मिळाले नाही यामुळे शेतकरी अर्जुन आंबेतकर यांना मोठया प्रमाणात नुकसानीला सामोरे जावा लागत आहे. व कोणत्याही प्रकारची लागवड करता येत नाही याकरिता शासनानी लवकरात लवकर यां घटनेवर कारवाई करून शेतकरी अर्जुन आंबेतकर यांना न्याय मिळवून द्यावा असं सांगण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट