अंगणवाडी सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी उपमहापौर श्री. रमाकांत मडवी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना विशेष निवेदन..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे – दिवा :- अंगणवाडीचा गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर संप चालू आहे. विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन न देता वेतन द्यावे तसेच अंगणवाडी भाडे यामध्ये वाढ करावी अशा मागण्यांच्या संदर्भात उपमहापौर श्री रमाकांत मडवी साहेब यांना घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासंदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले.



निवेदन देण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ सुवर्णाताई कदम, लता बोरसे , गायत्री कानसकर आणि बऱ्याचशा सेविका आणि मदतनीस उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com