पालघर पोलीसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चे खासदार श्री राजेंद्र गावित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन….

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:-दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ : ००वाजता पालघर जिल्हा पोलीस वाहतूक शाखा पालघर आयोजित रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चे आयोजक प्रभारी अधिकारी वाहतूक शाखा पालघर मा. श्री. आसिफ बेग साहेब यांच्या नियोजना खाली रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी प्रमुख पाहुणे लोकसभा खासदार पालघर मा.श्री. राजेंद्र गावित साहेब तसेच प्रमुख अतिथी पालघर आमदार मा. श्री. श्रीनिवास वनगा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी आमदार डहाणू मा.श्री. विनोद निकोले साहेब तसेच आमदार वाडा भिवंडी मा.श्री.शांताराम मोरे व आमदार विक्रमगड मा. श्री. सुनील भुसारा व आमदार बोईसर मा श्री. राजेश पाटील साहेब जिल्हा अधिकारी पालघर मा. श्री. गोविंद बोडके साहेब आपले पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. बाळासाहेब पाटील मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद पालघर मा. श्री. भानुदास पालवे साहेब पोलीस उपअधीक्षक पालघर मा. श्री. संगीता शिंदे अल्फान्सो मॅडम व पालघर अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. पंकज शिरसाट साहेब पालघर पोलीस होम डि.वाय.एस. पी. मा. श्री. नीता पाडवी मॅडम  तसेच पालघर पोलीस स्टेशनचे पी आय मा. श्री. दत्तात्रय किंद्रे साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे मुख्य हेतु म्हणजे या कार्यक्रमामध्ये रिक्षा, मॅजिक टेम्पो तसेच इतर टुरिस्ट वाहन चालकांना व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अपघात होण्याचे कारण चार चाकी वाहनचालक सीट बेल्ट न लावता, मध्य प्राशन करुन गाडी चालवने, वाहन चालवताना फोनवर बोलणे, दुचाकी वर हेल्मेट न लावणे ,दुचाकी चालवताना फोनवर बोलणे, मद्य प्राशन करून दुचाकी चालवणे व अतिवेगवान वाहन चालवणे या सर्व गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरतात या सगळ्या गोष्टीला आळा बसावा व वाहन चालकाने वाहनांचे नियम पाळावे असे पालघर जिल्हा वाहतूक शाखा पालघर जिल्हा पोलीस यांनी पालघर वासीयांना आयोजित कार्यक्रमामध्ये संबोधीत करण्यात आले .

  या कार्यक्रमाला उपस्थित पालघर जिल्ह्यातील रिक्षा ,मॅजिक टेम्पो ,ट्रक तसेच इतर वाहन चालक , पत्रकार तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट