सावित्री पुलावर झालेल्या डंपर आणि कारचा समोरासमोरील अपघात प्रवासी गंभीर जखमी …

0
Spread the love

उपसंपादक – राकेश देशमुख

भोर -पुणे रोड :- शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी सावित्री पुलावर डंपर आणि पुण्यावरून येणाऱ्या फोर व्हीलर कारची समोरासमोर धडक पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला झोप आल्यामुळे सदर दुर्दैवी घटना घडली यामध्ये कारचालक आणि सोबत असलेले प्रवासी जखमी झाले आहेत, जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने आमदार भरत शेठ गोगावले यांच्या संरक्षणार्थ असलेल्या पोलीस गाडी मध्ये रुग्णालयात गोगावले यांनी पाठवून दिले.

आमदार भरत शेठ गोगावले हे पोलादपूर कडे कार्यक्रमाला जात असताना समोर झालेला अपघात पाहून गाडीतून खाली उतरले आणि जखमी झालेल्या प्रवाशांना आपल्या सोबत असलेल्या पोलीस व्हॅन मध्ये बसवून रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले.

या दुर्घटने वेळी आमदार साहेबांसोबत असलेले त्यांचे सहकारी आणि महाड शहरातील कार्यकर्ते तसेच स्थानिक कार्यकर्ते शिवसैनिक आजूबाजूचे ग्रामस्थ यांनी देखील स्वतः गाडीतून उतरून प्रवाशांना मदत केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट