सातारा जिल्हयातील कराड तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०२ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- सातारा जिल्हयामध्ये कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाने टोळी प्रमुख १) आबीद आलम मुजावर, पय २६ वर्षे, तसेच टोळी सदस्य २) साहील आलम मुजावर, वय २१ वर्षे, दोन्ही सर्व रा. १२१ पालकरवाडा, मंगळवार पेठ, कराड ता.कराह जि सातारा यांचेवर सातारा जिल्हयामध्ये टोळीने बेकायदेशीर जमाप जमपुन दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करणेचायतचे शरिराविरुध्दचे बरेचसे गुन्हे करीत असल्याने कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पी.बी. सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक, कराड शहर पोलीस ठाणे वांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण मातारा क्रिता, सांगली जिल्हयातील शिराळा, चाळवा, कडेगांव तालुक्यातून दोन वर्षे तड़ीपार करणेबावतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता, सदर प्रस्तावाची चौकशी अमोल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी फेली होती,

यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेतिर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेचर इशाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदचाचा कोणताच वाक न राहील्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती,

वरील टोलीस मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हा सांगली जिल्हयातील शिराळा, पाया, कडेगांव तालुका हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्द‌पारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन १६ उपद्रवी टोळयांमधील ५१ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा

जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाणेचे सफी संजय देवकुले, पोकों आनंदा जाधव, म. पोकों सोनाली पिसाळ यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट