भूमिगत जलबोगदा खणन कामातही महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी…!

0
Spread the love

प्रतिनिधी-सायली मळेकर

मुंबई: अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये एका महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन करण्यात आली.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या अभियांत्रिकी कौशल्याची सर्वत्र वाखाणणी केली जात आहे.

अमरमहाल ते ट्रॉम्बे जलबोगदा कामात एका दिवसात ४० मीटर खणन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा साध्य होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या वतीने पुर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत.

अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा आहे.

अमरमहाल ते ट्रॉर्म्बे उच्च पातळीच जलाशयपर्यत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर बांधण्यात येत आहेत. त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे.

पूर्व दॄतगती मार्गावर स्थित दोन मुख्य जलवाहिन्यांमधून येणारे पाणी या बोगद्यांव्दारे पुढे जाणार आहे.

या भूमिगत जलबोगदांसाठी टेराटेक कंपनीचे बोगदा खणन संयंत्र कार्यान्वित आहे.

टेराटेक कंपनीने ‌जलद बोगद्याच्या कामामध्ये डिसेंबर २०२१ या एकाच महिन्यात तब्बल ५२६ मीटर खणन पृर्ण करण्यात आले आहे.अव्घा ८५ दिवसांच्या कालावधीत सुमारे १ किलोमीटर चे खणन पृर्ण करण्यात आले आहे.त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञांकडून महानगरपालिकेचे कौतुक केले जात आहे.

या कामाची सुरुवात ६ मार्च २०२१ रोजी राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री आदित्य ठाकरें यांच्या हस्ते करण्यात आली होती.

महानगरपालिका आयुक्त डॉ इकवाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री.पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही जलबोगदयांची कामे वेगाने सुरू असुन कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असताना देखील या दोन्ही जलबोगदांची खंड पडू दिलेला नाही.

एवढे नव्हे तर चेंबूर ते वडाळा या अंतराचा अंशतः बोगदा सन २०२५ मध्ये सुरू होऊ शकेल अशी आशा आहे.

या दोन्ही जलबोगदांची काम‌ पृर्ण झाल्यानंतर १०० किलोमीटर पेक्षा अधिक अंतराचे भूमिगत पाणीपुरवठा बोगदे असणारे मुंबई हे जगातले दुसरे शहर ठरणार आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट