छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

छत्रपती संभाजीनगर:- दिनांक ०८/०१/२०२४ रोजी सकाळी ०९:०० ते १६:०० पर्यंत पोलीस विभागाचे कामकाजाची माहिती ही विद्यार्थ्यांना व्हावी या करिता मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक संकल्पनेतुन महात्मा गांधी मिशन विद्यापीठ (एम.जी.एम.) येथील कॅम्पसमधील चिंतन गाह परिसरात पोलीस विभागातील कार्यरत विविध शाखांचे कामाजाचे स्वरूप व माहिती दर्शविण्यारे ०६ स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये १) महिला व मुली यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कार्यरत असलेले भरोसा सेल २) सायबर सेल ३) बॉम्ब शोधक व नाशक पथक ४) शरत्र प्रदर्शन ५) वाहतुक शाखा यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी मा. अंकुशराव कदम, कुलपती, एम.जी.एम. विद्यापीठ, मा विलास सपकाळ, कुलगुरू, मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. आशिष गाडेकर कुलसचिव एम.जी. एम. श्री तुषार गांधी, समाजसेवक, विविध शाखेतील प्राध्यापक व विभागप्रमुख यांची उपस्थितीती होती.

यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी विद्यार्थ्यांना पोलीसांचे अंतर्गत कामकाज हे मर्यादित नसुन प्रगल्भ स्वरूपाचे आहे. विविध शाखा या पोलीस विभागात कार्यरत आहेत. सिनेमात पोलीसांची दाखवण्यात येणारी प्रतिमा ही प्रत्यक्षात तशी नसून कित्येक पटीने वेगळी आहे. पोलीस हा नागरिकांनचा शत्रु नसून मित्र आहे. पोलीसांची यंत्रणा ही अनेक घटकांवर अवंलबुन आहे त्याचे कामकाज कसे चालते हे युवंकाना माहिती नसते. त्याचे मनात अनेक शंका असतात आणि त्या दूर करण्यासाठी या प्रदर्शनाचे माध्यमांतुन त्याच्याशी सुसंवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे.

तसेच सायबर व आर्थिक फसवणूक, वाहतुक नियमन व नियम याबाबत जनजागृती होईल या दृष्टीकोनातुन हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

यावेळी विद्यार्थीनीनी भरोसा सेल या स्टॉल ला भेट देवून महिला व मुली यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन करण्यात येणारे उपाय योजना तसेच त्यांचे संरक्षणार्थ असलेले कायदेशिर अधिकार व कायदे यांचे सखोल माहितीची आस्थेवाईकपणे विचारपुस करून ही सपोनि आरती जाधव यांचे कडुन प्रश्न-उत्तराचे स्वरूपात जाणुन घेतली.

याचप्रमाणे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ही पोलीसांचे विविध शस्त्र व श्वानपथकाचे प्रात्यक्षिकाला मिळाली मुलांनी अत्यंत बारकाईने सर्व शस्त्रांची पाहणी करून घेवुन शस्त्रे कसे चालवता तसे त्यांची नावे व क्षमता याबाबत पो.उप.नि. बाळासाहेब मोरे यांनी दिली.

तसेच गुन्हे व बॉम्ब शोध यामध्ये महत्वाची भुमिका निभावणारे पोलीस श्वान जुलिया हिचे गुन्हेगार शोध प्रात्याक्षिक व कवायत, आणि प्रिन्स या धानाचे बॉम्ब शोध प्रात्यक्षिक बघुन विद्यार्थी चकित झाले. श्वानांचे प्रशिक्षण तसेच त्यांचा अंगी असलेला अज्ञाधारक पणा व त्यांचे कर्तव्य याबाबत पो.उप.नि. मिलींद कुलकर्णी व प्रदिप ठुबे यांनीमाहिती दिली आहे. याचप्रमाणे तंत्रज्ञाना वापर करून होणारी ऑनलाईन फसवणूक, सेक्सटॉर्शन संबधीचे गुन्हे, तसेच मोबाईल हरविले किंवा चोरी गेल्यास त्याबाबत सी.ई. आय. आर. C.E.I.R. या पोर्टलवर तक्रार नोंदविण्याबाबता विस्तृत माहिती पोउपनि प्रविण पाटील यांनी दिली.

तसेच वाहतुक नियमांचे, वाहन चालविण्यचा परवाना, तसेच अपघताचे वेळी अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करण्याचे अनुषंगाने करावयाची मदतीबाबत वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या पोलीस प्रदर्शनीच्या माध्यमांतुन विद्यार्थ्यांनी अत्यंत कुतूहालांने प्रत्येक स्टॉलला भेट देवून पोलीसांची कार्यप्रणाली अत्यंत सचोटीने समजावुन घेतली. यावेळी ४०० ते ५०० विद्यार्थी व विद्यार्थीनी प्राध्यापक वर्ग यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय सहाणे, पोलीस निरीक्षक, श्री. अण्णासाहेब वाघमोडे, रा. पोलीस निरीक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट