लामण इंडस्ट्रीयल पार्क प्रस्तुत “लेक माहेरचा कट्टा ” या नारीरत्न पुरस्काराचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के

नवी मुंबई:-दिनांक ६ जानेवारी २०२४ लामण इंडस्ट्रीयल पार्क प्रस्तुन लेक माहेरचा कट्टा आयोजित नारीरत्न पुरस्कार विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमामध्ये ज्या महिला समाजासाठी उल्लेखनीय कार्य करतात अशा महिलांचा गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे एका पुरुषाप्रमाणे स्वतःच्या घराला आर्थिक हातभार लावून घर सांभाळून आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी झाल्या आहेत त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
प्रमुख पाहुणे
श्री. विशाल बडे सर
Ibn लोकमत चे सिनियर रिपोर्टर
सौ स्वाती थोरात
राज्यकर उपायुक्त (GST विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई),
श्री विशाल माने
सहा ,पोलीस निरीक्षक विशेष शाखा नवी मुंबई


सौ शारदा पोवार
उपजिल्हाधिकारी
( मालमत्ता अधिकारी)
सौ ममता डिसोजा
ACP
लेक माहेरचा कट्टा या समूहाच्या संस्थापक सारिका प्रमोद ढाने
या सर्व मान्यवारांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
तसेच दशमी चित्रपटाची टीम सुद्धा उपस्थित होती.
ज्यामध्ये अमरीश पुरी यांचे नातू वर्धान पुरी ,निर्माते शंतनू तांबे आणी अभिनेते गौरव सुद्धा उपस्थित होते .
या कार्यक्रमध्ये ५० जणिचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .तसेच काही समाजिक संस्थेचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .


या कार्यक्रमामध्ये मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे लेक माहेरचा कट्टा या समूहाची ऍडमिन टीम कविता कोंडभर, वर्षा नागरे, पूनम दुसाने ,दीपाली बिरादार ,दीपाली मोरे , गौरी तटकरे , हेमलता चंदनशिवे , स्वाती दाभाडे,मयूर मोहिते पाटील, राहुल वाळवेकर , गिरीजेश गुप्ता तसेच या पूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले होते .
लेक माहेरचा कट्टा या टीम चे मेम्बर राहुल माळगावकर लामण इंडस्ट्रीयल इस्टेट चे संस्थापक निलेश गजमल यांचे आणी त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com