दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मा. श्री. योगेशदादा कदम यांच्याहस्ते दापोली तालुक्यातील असोंड पं. समिती गणातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाले.

0
Spread the love

दापोली प्रतिनिधी :-अभिजित माने

दापोली तालुक्यातील बुरोंडी पंचायत समिती गणातील विविध विकास कामांसाठी आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी शासन स्तरावरुन तब्बल “१ कोटी ३२ लाख ६१ हजार रुपयांचा” निधी मंजूर करून आणला. सदर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन बुरोंडी पंचायत समिती गणातील शिवसेना, महिला आघाडी,युवा सेना पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मार्गदर्शन करतेवेळी मा.आ.योगेशदादा कदम
मा.आ.योगेशदादा कदम यांचे स्वागत

१) चिखलगांव कांबळेवाडी रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन – ५ लाख – मुलभूत सुविधा अंतर्गत

२) चिखलगांव येथे साकव बांधणे कामाचे भूमिपूजन – ३० लाख रुपये– जिल्हा वार्षिक योजना

३) वणौशी तर्फे पंचनदी भागडीवाडी रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन – ५ लाख रुपये – २५१५ मूलभूत सुविधा अंतर्गत

४) वणौशी तर्फे पंचनदी भागडीवाडी रस्त्याचे उद्घाटन – ५ लाख रुपये – २५१५ मुलभूत सुविधा अंतर्गत*

५) वणौशी तर्फे पंचनदी वडवाडी रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन – ५ लाख रुपये – २५१५ मुलभूत सुविधा अंतर्गत

६) वणौशी तर्फे पंचनदी –दाभोळ-वणौशी–भिवबंदर–आघारी तिवरे रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन – ३७ लाख ६१ हजार रुपये – मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०२०–२१

७) आघारी फाटा ते आघारी गावापर्यंत जाणारा रस्त्याचे उद्घाटन – २५ लाख – २५१५ मुलभूत सुविधा व जिल्हा नियोजन अंतर्गत

८) आघारी तिवरे रहाटेवाडी रस्ता डांबरीकरण करणे व संरक्षक भिंत बांधणे कामाचे भूमिपूजन – १० लाख रुपये – २५१५ मुलभूत सुविधा अंतर्गत

९) बोरीवली वरची वाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन – ५ लाख रुपये – २५१५ मुलभूत सुविधा अंतर्गत

शिवसेना दापोली माजी तालुकाप्रमुख श्री. प्रदिप सुर्वे, महिला आघाडी उपजिल्हासंघटीका सौ. रोहिणी दळवी, महिला आघाडी तालूकासंघटीका सौ. दिप्ती निखार्गे, बुरोंडी – दाभोळ जि. प. गट समन्वयक श्री. सुधीर वैद्य, बुरोंडी पं. समिती गण समन्वयक श्री. सुनिल कूळे, विभागप्रमुख श्री. दिपक घडशे, दाभोळ विभाग मुंबई संघटक श्री. किरण नाचरे, बुरोंडी युवा सेना उपविभागअधिकारी श्री. राजेंद्र जाधव, वणौशी गावचे सरपंच श्री. दिनेश आडविलकर, शाखाप्रमुख श्री. रमेश भुवड, आघारीचे शाखाप्रमुख श्री. संजय खळे, वणौशी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. दत्ताराम गुरव, ग्रामपंचायत सदस्या सौ. संघवी शिंदे, श्री. संदेश तोडणकर, सौ. संध्या पालकर, सौ. योगिता कनगुटकर, शाखाप्रमुख श्री. रमाकांत दाभोळकर, श्री. बापू खोत, श्री. सिध्देश वैद्य यांसहीत पंचक्रोशीतील शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

समस्त ग्रामस्थ व महिला मंडळ

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट