कोकरुड येथे श्री निनाईदेवी यात्रा व उरूस महोत्सव निमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली : कोकरूड :- कोकरूड ता.शिराळा येथे श्री.निनाईदेवी यात्रा व उरूस महोत्सव निमित्त श्री. निनाईदेवी यात्रा कमिटी व कोकरूड व माळेवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने भव्य कुस्त्याचे जंगी व मोठ्या उत्साहात पार पडले.

या कुस्ती मैदानात उपस्थित राहत कुस्त्या शौकिनांच्या बरोबर कुस्त्या पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी या मैदानासाठी प्रथम क्रमांक उपस्थित डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध हिंदकेसरी पैलवान शाटी कुमार यांच्या कुस्तीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे यांने चटकदार कुस्ती करत डोळ्याचे पारणे फेडले.



पै.शिवराज च्या विजया नंतर कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला. या कुस्ती मैदानामध्ये अनेक लहान मोठ्या कुस्त्या चांगल्या झाल्या. या कुस्ती मैदान साठी कुस्ती शौकीनं, यात्रा कमिटी चे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com