चिपळूण मध्ये ग्रामपंचायत आबिटगाव यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व वर्षपुरती सोहळा संपन्न…

0
Spread the love

रत्नागिरी : चिपळूण

प्रतिनिधी-सचिन घाणेकर

     आपल्या गावासाठी काही तरी  करावे. गावाचा विकास झाला तर तालुका अन देशाचा विकास होईल. गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनेल. गावात  विकासाच्या योजना सर्वसामान्या पर्यत पोहचवून लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरपंच सुहास भागडे आणि सर्व सहकारी करीत आहेत.  याचाच भाग म्हणून या वर्षी ग्रामपंचायत आबिटगाव यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपले गाव हेच आपले कुटुंब समजूनच समाज कार्य करत राहणे. आपल्या पदाचा व अधिकाराचा जनतेच्या हितासाठी उपयोग करणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवुन सरपंच कार्य करीत आहेत. गावच्या सुख- दुःखात सहभागी होऊन संकटसमयी मदतीचा हात पुढे करणाऱ्या आपल्या गावातील विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न पूर्णत्त्वाकडे नेण्यासाठी सैदव प्रयत्नशील असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व सरपंच सुहास भागडे यांच्या एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला.

या एक वर्षात केलेल्या गावच्या विकासाचा आढावा जनतेसमोर ठेवला. एक वर्षात गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतील कर्मचारी सर्व सदस्य यांचा पाठिंबा व मार्गदर्शन या सर्वांच्या सहकार्याने विकास करण्यात आला असे त्यांनी सांगितले .

कार्यक्रमाला विभागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य , समाजसेवक असे अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी ओंकार वेपर्स चे मालक सीताराम कदम, पं.स. माजी उपसभापती शरद शिगवण, माजी सरपंच तुरंबव सुनिल जाधव, तानाजीराव चोरगे, कृषी विद्यापीठ मांडकी पालवण निखिल चोरगे, निवळी उपरपंच मनोज डीके, लक्ष्मण कोकमकर, सरपंच दिनेश पुणवत, वैैष्णवी नेटके आबलोली, सोनल घाणेकर खांडोत्री, समीक्षा बारगोडे, चंद्रकांत तानकर, नम्रता मोहिते, नरेश टोळे, भारती लाड, श्रेया वीरकर, श्रावणी भुवड, श्रीकृष्ण घाग, उपसरपंच अमोल कोदारे, प्रवीण खांडेकर, महेंद्र बारगोडे, शुभास जावळे, पोलीस पाटील श्रेया दुर्गवले, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव भागडे, रत्नू भागडे, बाळाराम भागडे, जयराम भागडे,शिवराम भागडे,विजय खेराडे, सिद्वर्था पवार, काशीराम भागडे, दीपक शिर्के, चंद्रकांत सकपाळ, कृष्णा भागडे,तुकाराम भागडे, वासुदेव भागडे, अनेक मान्यवर मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीचंद्र भागडे व आभार प्रदर्शन अंनत पवार यांनी केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट