मुंबईत बायको आणि लेकीनी केली खलबत्याने ठेचून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या…

ठाणे : कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबईत कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीसाची दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी निघृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबईच्या कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची कल्याणमधील राहत्या घरी हत्या झाली आहे.
प्रकाश यांची हत्या पत्नी आणि मुलीने केल्याचे उघड झाले आहे.पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुलगी भाग्यश्री हिचं ३ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं मात्र भाग्यश्री सासरी नांदत नसल्याने बोरसे यांच्या घरात नेहमी वाद होत होते.याच वादातुन काल पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री यांनी त्यांची हत्या केली .
सविस्तर वृत्त असे की , श्री. प्रकाश बोरसे हे कल्याण पूर्व येथील हिरा पन्ना अपार्टमेंट, नाना पावशे चौक येथे आपली पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री सोबत रहावयास होते.
दिनांक 6 जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास प्रकाश बोरसे घरी आले असता त्यांचा पत्नी आणि मुली सोबत वाद झाला.या वादातुन दोघींनी खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यावर प्रहार करत त्यांना जखमी केलं.
या हल्ल्यात प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला.मृत्यूनंतर दोघी घराचा दरवाजा बंद करून एका बाजुला बसुन होते जवळपास ४ तास दोघी घरात बसून होत्या.
याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बशीर शेख यांना मिळाली. श्री. बशीर शेख यांनी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना केलं असता पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर घरात प्रकाश यांचा मृतदेह आढळुन आला.
मृतदेहाशेजारी पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री बसुनच होत्या ते पहाता पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेवुन पुढील तपास कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाणे करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com