महाड मध्ये बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने 95 वा मनुस्मृती दहन दिन तथा मानव मुक्ती दिन साजरा…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: 25 डिसेंबर 1927 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यमाने 95 वा मनुस्मृती दहन दिन तथा मानव मुक्ती दिना निमित्त महाड क्रांतीस्तंभ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष बौद्धजन पंचायत समितीचे सभापती मा. आनंदराज आंबेडकर यांनी चवदार तळे येथे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी या कार्यक्रमाला सभाध्यक्ष व बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर,प्रमुख मार्गदर्शक विनोद मोरे,महाड तालुका अध्यक्ष अशोक जाधव, महाड तालुका सचिव सखाराम जाधव, कार्याधक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, माजी कार्याधक्ष किशोर मोरे, उप कार्याधक्ष चंद्रमणी तांबे, खजिनदार नागसेन गमरे, सचिव यशवंत कदम, नाना शिंदे, महिला मंडळ अध्यक्ष सुशीला जाधव, मर्चंडे ताई, विजय पवार, मंगेश हाट्टे, भीमराव धोत्रे, राजेंद्र पाटणे व्यवस्थापक मंडळ सदस्य, बौद्धचार्य, शाखा पदाधिकारी, सभासद, सर्व गाव, तालुका शाखा / संघटना,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com