91 तोळे सोने चोरून फरार मोलकरणीला उल्हासनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या….

उल्हासनगर : उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत रहावयास असणाऱ्या राम तनवाणी यांच्या घरी मोलकरीण म्हणुन काम करण्याच्या बहाण्याने घरात घुसून ९१ तोळे सोने चोरी करणाऱ्या महिलेला उल्हासनगर पोलीसआणि क्राइम ब्रांचने अटक केली आहे.

या महिलेकडून उल्हासनगर पोलीसांनी २५ तोळे सोने हस्तगत केले आहे. पोलीस तपासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की ,मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये तिने अशाच प्रकारे चोऱ्या केल्या आहेत. तिच्यावर १२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
एकाच घरातून तिने तब्बल ९१ तोळे सोने चोरले होते. घरकाम करण्याच्या बहाण्याने ती घरात गेली होती . संपूर्ण कुटुंब घराबाहेर गेल्यानंतर तिने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडून सोने चोरी करून ती पसार झाली होती.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, उल्हासनगरमध्ये घरकाम करण्याचा बहाणा करून एका घरातून ९१ तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला उल्हासनगर पोलीसांनी गजाआड केले आहे. राम तनवाणी यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेने ही चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला सापळा रचून अटक केली आहे .
आरोपी महिला पोलिसांना चकवा देत होती. आणि विशेष म्हणजे, या महिलेवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकुण १२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिळाली आहे. उल्हासनगर क्राइम ब्रांचने महिला आरोपीकडून एकुण २५ तोळे सोने हस्तगत केले आहे. त्यामुळे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल मांगळे यांच्यासहित त्यांचे सहकारी आणि उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com