जॉय रायडिंगसाठी ९ मोटार सायकल चोरी करणा-या विधी बालक व आरोपीस कोंढवा पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोंढवा :-कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी सुचना दिल्या होत्या.

सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल थोरात, सुहास मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम हे खड़ी मशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणाऱ्या धमार्वत पेट्रोल पंपाच्या गल्लीत काळे व निळे रंगाची पेंशन प्लस मोटार सायकल घेवुन उभे असुन त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही, सदर मोटार सायकल चोरीची असल्याबाबत संशय आहे.

सदर माहितीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी कोंढवा पोलीस ठाणे कडील तपास पथक स्टाफ शोध घेणकामी गेला असता त्याठिकाणी दोन इसम हे त्याच्याकडील बंद पडलेली विना नंबर प्लेट मोटार सायकल चालु करित होते. तेव्हा त्याच्याकडे असणारी मो.सा. चोरीची असल्याचा संशय वाटल्याने त्यांना दि.०७/०८/२०२४रोजी ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता ते विधी, संघर्षग्रस्त बालक असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याच्याकडे मिळुन आलेल्या मो.सा. बाबत चौकशी केली असता ते उडवाडवीचे उत्तरे देवु लागले तेव्हा त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याच्या ताब्यात मिळुन आलेली पेंशन मो.सा.ही काकडे पॅलेस कर्वेनगर येथुन चोरी केली असल्याचे सांगितले.

त्याच्याकडे अधिक तपास केला
असता त्यांनी
१) केटीएम २०० डुक मोटार सायकल क्र. एम. एच. १२ के. के.०३०८,
२) अॅक्टिव्हा मोटार सायकल क्र.एम.एच.१३सी.एफ.०६५८,
३) अॅक्टिव्हा मोटार सायकल क्र.एम.एच.१२ एम.एच.२८७०,
४) अॅक्टिव्हा मोटार सायकल क्र.एम.एच.१२टी.ई. ९४३२.
५) पेंशन प्रो. मोटार सायकल क्र. एम.एच.१२जे.डी. ५०१८,
६) डिओ मोटार सायकल क्र.एम.एच.१२ इ.झेड. ११९२,
७) अॅक्सेस मोटार सायकल क्र.एम.एच.१२ यु.ई.३६२९,
८) स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल क्र.एम.एच.१२ जे. डब्ल्यु.२८८१ अश्या
९ मो.सा. आरोपी आकाश दिपक धनवटे, वय १९ वर्षे, रा. लोहगाव गुरुव्दारा कॉलनी लेन नं.१०, ता. हवेली जि. पुणे यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.

सदर गुन्हे हे विधी बालक यांनी मौजेसाठी चोरी केल्याचे उघड झाले आहे. विधी बालक व आरोपी यांच्याकडुन विमानगर पोलीस ठाणे कडील एकुण ०३, कोंढवा पोलीस ठाणे कडील ०४, वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील ०१, लोणीकंद पोलीस ठाणे कडील ०१ असे एकुण ०९ गुन्हे उघड होवुन ३.६०,०००/-रु कि मो.सा. जप्त करण्यात आलेल्या आहेत.

वरिलप्रमाणे कामगिरी ही मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा.रंजन शर्मा साो, सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. आर. राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा. धंन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोउपनिरी बालाजी डिंगोळे, अंमलदार अमोल हिरवे, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत जाधव, राहुल रासगे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे, अनिल बनकर यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट