९ लाखांचे दागिने व लाखो रुपयांच्या मोबाईलचा ६ तासांतमुंबईच्या ट्रॉम्बे पोलीसांनी लावला शोध..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई :– ९ लाखांचे सोन्याचे दागिने व १ लाख २९ हजार रुपयांचा गहाळ झालेल्या मोबाईलचा अवघ्या ६ तासांत शोध घेण्यात आला. ही उत्तम कामगिरी मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिसांनी केली. या कामगिरीबद्दल दाम्पत्याने पोलिसांचे आभार मानले.


२०२४ रोजी निवृत्ती विठ्ठल सातपुते (वय ४२) हे १९ जुलै रोजी पत्नीसह कौटुंबिक कार्यक्रमाकरिता नवी मुंबईतील वाशीत गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर परत राहते घरी महाराष्ट्रनगर येथे ते आॅटो रिक्षाने आले. त्यावेळी दागिने व मोबाईल ठेवलेली लेडीज पर्स रिक्षामध्ये विसरल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यानुसार तत्काळ रात्रपाळी पयर्वेक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरकाने यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक नाणेकर व गुन्हे प्रकटीकरण पथक असे रवाना झाले.

तक्रारदार यांचे बिल्डिंगच्या मेन गेट वरील सोसायटी व मानखुर्द टी जंक्शन येथील शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सदर आॅटो रिक्षाचा क्रमांक प्राप्त केला. वाहन अ‍ॅप वरून आॅटो रिक्षाचे मालक यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचे लोकेशन प्राप्त केले. सदर प्राप्त लोकेशनद्वारे चकाला येथे आले. त्यानुसार जाऊन आॅटो रिक्षाचालक याचा शोध घेतला असता सदर रिक्षा चालक हा चकाला मेट्रो स्टेशनच्या जवळ मिळून आला, सदर आॅटो रिक्षाची तपासणी केली असता पाठीमागील डिकीमध्ये ठेवलेली लेडीज पर्स मिळून आली. त्याम्त १ लाख ४० हजारांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, ३५ हजारांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची गणपतीची अंगठी, ३५ हजारांची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १ लाख ७५ हजारांच्या २५ ग्रॅम वजनाच्या ५ लेडीज सोन्याच्या अंगठ्या, ७० हजारांचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र, ५० हजारांची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, ७० हजारांचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले, ७० हजारांचे १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ७० हजारांची २०० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३५ हजारांच्या ५ ग्रॅम वजनाच्या २ नाकातील नथ, १५ हजारांचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, १ लाख २९ हजार ९९९ रुपयांचा सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा मोबाईल असा एकूण ९ लाख ६४ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल होता. या सर्व मुद्देमाल सातपुते यांना परत करण्यात आला.


ही उत्तम कामगिरी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे व रात्रपाळी पयर्वेक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरकाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकूर, पोलीस हवालदार संजय आव्हाड, प्रमोद लेभे, दशरथ राणे, प्रदीप देशमुख, मोनिका निकाळजे यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट