घरफोडी चोरी करणारे अट्टल चोरांना हिंजवडी पोलीसांनी अटक करून चोरीचे ९ गुन्हे केले उघड..

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

पुणे :– दिनांक २३/०५/२०२४ रोजी फिर्यादी नामे अभिजीत गोकुळदास मारवाडी वय-३८ वर्षे धंदा-नोकरी रा.घर नं -अ/७०१, आमोरा होम्स कस्प्टे वस्ती ता. मुळशी जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना दिनांक २४/०५/२०२४ रोजी राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदार यांचेमार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे
१) दयामान्ना शिवपुरे
२) दुर्गाप्पा श्रीराम यांनी केलेला असुन ते हिंजवडी भागात येणार असल्याची खबर मिळाल्यावरुन वरील आरोपींबाबत हिंजवडी पोलीस ठाणेचे सपोनि राम गोमारे, व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी त्यांना सापळा लावुन ताब्यात घेवून आरोपी नामे १) दयामान्ना यल्लाप्पा शिवपुरे वय-४२ रा. शिवाजीनगर दत्तमंदीराचे मागे, देहुरोड पुणे २) दुर्गाप्पा श्रीक्रिष्णा श्रीराम वय-४५ रा. शिरालींग नगर जुना बिडी घरकुल सोलापुर यांस पकडुन त्यांना दिनांक २४/०५/२०२४ रोजी ००/३५ वा. अटक केली.

त्यांचे रेकॉर्ड तपासले असता आरोपी क्रमांक १ याचेवर यापूर्वी देहुरोड पो.स्टे., चतुश्रृंगी पो.स्टे., हिंजवडी पो.स्टे. निगडी पोलीस ठाणे, पिंपरी पोलीस ठाणेत चोरी व घरफोडी चोरीचे १२ गुन्हे दाखल असल्याचे समजले त्या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता त्यांनी हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भा.द.वि. कलम ४५४. ४५७, ३८० गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे काही दागिने काढून दिले.

आरोपी यांचे रेकॉर्ड तपासुन त्यांची पोलीस कोठडी घेवून पुन्हा त्यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपीत मजकुर यांनी दोघांनी मिळून खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल करुन यातील सोने व चांदीचे दागिने व इतर साहित्य काढुन दिले आहेत.

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६९/२०२४, भादवि कलम ४५४,४५७, ३८०,३४

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६३१/२०२४, भादवि कलम ३८०

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ५८२/२०२४, भादवि कलम ४५४,४५७,३८०

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं १९८/२०२४, भादवि कलम ४५४,४५७,३८०,४२७

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ३१/२०२४, भादवि कलम ४५४,४५७,३८०

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ६६०/२०२४, भादवि कलम ४५४,४५७,३८०

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ५५९/२०२४, भादवि कलम ४५७,३८०

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ११२८/२०२३, भादवि कलम ४५४, ४५७,३८० ९.

हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ७९३/२०२३, भादवि कलम ४५४,३८०,४२७

आरोपींनी वरील प्रमाणे गुन्हे केल्याचे कबुल केल्याने त्यांचेकडुन एकुण १० तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तसेच चांदीचे दागिने असे एकुण ४,८०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला असुन वरील प्रमाणे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१. आरोपी क्रमांक १ याचेवर यापुर्वी दाखल गुन्हे खालीलप्रमाणे आहेत.

विजापुर नाका, सोलापुर

सांगवी

४४९/२००९ भादविक ३७९

चतुश्रृंगी

४४/२००६ भादविक ४५४, ४५७, ३८०,३४

१२/२०१० मादविक ४५४, ४५७, ३८०,३४

१३७/२०१० भादविक ४५४, ४५७, ३८०,३४

पिंपरी

३०८/२०११ भादविक ३५३,४५८, ३८०

८०/२०१२ भादविक ३५३,४५८, ३८०

वाकड

७५८/२०१६ भादविक ४५४, ४५७, ३८०,३४

निगडी

८५३/२०१६ भादविक ३०७, ३५३

कोथरुड

२९१/२००७ भादविक ३८१

चतुश्रृंगी

४७९/२०१७ भादविक ४५४, ४५७, ३८०,३४

४०७/२०१७ भादविक ४५४, ४५७, ३८०,३४

निगडी

१६/२०१६ भादविक ४५४, ४५७, ३८०,३४

आरोपी क्रमांक २ याचेवर यापुर्वी दाखल गुन्हे खालीप्रमाणे आहेत.

अ.क्र पोलीस ठाणे गुरने व कलम

एमआयडीसी

१११/२०१२ भादविक ४५७, ३८०

विजापुर नाका सोलापुर

११०/२००७ भादविक ३९९ आर्म अॅक्ट ३. २५

सदर बाजार

५०/२००६ भादवि. ३७९, ४११, ३४

सदरची कारवाई मा.श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चि यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे यांनी केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त श्री बापु बांगर यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट