विधीसंघर्षित बालकाकडुन चोरीचे ८ मोबाईल जप्त मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस

उपसंपादक – रणजित मस्के
नाशिक :- गुन्हेशाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर यांची कामगिरी
नाशिक शहरातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस आयुक्त सो., मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते..
त्याअनुषंगाने मोबाईल चोरीच्या गुन्हयाचा तपास गुन्हेशाखा युनिट १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असतांना पोना / महेश सांळुके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम हा चोरीचे मोबाईल विक्री करीता हनुवानवाडी मनपा गार्डन समोर पंचवटी नाशिक या ठिकाणी येणार आहे. अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती वपोनिरी विजय ढमाळ यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून संशयीत चोरटयांना ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील सपोउनि / ययाजी महाले, पोहवा / ७२१ भडांगे, पोहवा / २२१ गायकवाड, पोना / १८८३ काठे, पोअं/ २०५५ खांडरे, पोअं/२२७३ कोष्टी, चालक सपोउपनि / शिरसाठ, पोना / ८७९ महेश साळुंके अशांचे पथक पाठविले. असता, नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी हनुमानवाडी, मनपा गार्डन पंचवटी येथे जादुन संशयित इसम यास ताब्यात घेतले असता सदर इसम हा विधीसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे त्याचे पालकांचे मदतीने ताब्यात घेवुन विचारपुस करून अंगझडती घेतली असता त्याचेकडे चोरीचे ८ मोबाईल मिळुन आले व त्याने दिलेल्या माहितीवरून सदर गुन्हे तो व त्यांचा साथीदार असे दोघे मिळून करीत असल्याची माहिती दिल्यावरून पंचवटी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुरनं ३०९ / २०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. सदर विधीसंघर्षित बालक याचेकडुन चोरीचे एकूण ८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सदर मोबाईल कोठुन चोरले आहेत याबाबत अधिक तपास करून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. अंकुश शिंदे सो. पोलीस आयुक्त नाशिक, श्री. प्रशांत बच्छाव सो. पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा नाशिक शहर, डॉ. सिताराम कोल्हे सहा. पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, सपोउनि / बयाजी महाले, सपोउनि / साबरे, पोहवा / ७९१ भडांगे, पोहवा / १०९ वाघमारे, पोहवा / २२१ गायकवाड, पोना/ १८८३ काठे, पोना / प्रशांत मरकड, पोअं/ २०५५ खांडरे, पोअं/ २२७३ कोष्टी, पो.अं/ राहुल पालखडे, पो.अं/ २२६० बोरसे, चालक सपोउपनि शिरसाठ, पोना/ ८७९ महेश साळुंके अशांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com