महाड तालुक्यात 74 वर्षीय वृद्ध इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :-महाड तालुक्यातील कोकरे तर्फे गोवेल सावित्री खाडीच्या जेटीजवळ एका 74 वर्षीय वृद्ध इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आत्माराम दाजी आंबेकर असे बुडून मयत झालेल्या इसमाचे नाव असून आत्माराम आंबेकर हे 18 फेब्रुवारी रोजी घरातून अकरा वाजता बाहेर पडले यानंतर त्यांचा मृत्यू देह सायंकाळी पाण्यात सापडला. महाड तालुक्यातील कोकरे तर्फे गोवेल सावित्री खाडीतील जेटीजवळ खाडी किनारी आत्माराम आंबेकर हे शौचालयाला गेले असता अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले व पाण्यात पडल्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रुग्णवाहिका चालक रऊफ पठाण यांनी खाजगी रुग्णवाहिकेमध्ये सदरचा मृत्यू देह महाड ग्रामीण रुग्णालया येथे शवविच्छेदनाकरिता आणला असून महाड तालुका पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानप व पोलीस उपनिरीक्षक के.एफ. खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. पी.धोत्रे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com