मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत६,७३,२००/- रूपये किंमतीचा अवैद्य मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज जप्त शहापुर पोलीस ठाणेची कारवाई

सह संपादक -रणजित मस्के
इचलकरंजी :

पोलीस ठाणे
शहापुर पोलीस ठाणे इचलकरजी
गु.र.न.व कलम
२५५/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनीयम १९८५ चे कलम ८ [क] व २२ [क] अन्वये
फिर्यादी नाव व पत्ता
सतिश लक्ष्मण कुंभार पो.कॉ.ब.नं. २५४१ नेम-शहापूर पोलीस ठाणे, इचलकरंजी
गुन्हा घडला ता वेळ व ठिकाण
दिनांक १८/०७/२०२५ रोजी २३.५६ वाजताचे सुमारास कोरोची गावे हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची जाणारे रोडवर
जप्त मुददेमाल
माहिती कशी प्राप्त झाली
१)६,७०,२००/- त्यात मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ एकूण वजन १३४.०४ ग्रॅम ३) ५००/- रुपये किंमतीचे इतर साहित्य एकूण किंमत ६,७३,२००/- रूपये
२) २५००/- रुपये रोख रक्कम
पोकों सतिश लक्ष्मण कुंभार यांचे गुप्त बातमीदार मार्फ़त
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
मा. पोलीस अधिक्षक, कोल्हापुर श्री योगेशकुमार गुप्ता साो, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, गड विभाग कॅम्प इचलकरंजी, श्री आण्णासाहेब जाधव सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी. इचल. विभाग श्री समरसिंह साळवे साो याचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री सचिन सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्री महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, अर्जुन फ़ातले, रोहित डावाळे, सतिश कुंभार, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, होमगार्ड महेश शेळके, इम्रान मुल्ला
आरोपीचे नाव व पत्ता
१] ऋषभ राजू खरात वय ३० वर्षे रा. लोकमान्य नगर, कोरोची ता हातकणंगले
थोडक्यात हकीकत –
मा. पोलीस अधिक्षक साो, कोल्हापुर यांनी कोल्हापुर जिल्हयात मिशन झिरो ड्रग्ज अंर्तगत कारवाई करणे बाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत करून कोल्हापुर जिल्हया मध्ये अंमली
पदार्थ विरोधी विशेष मोहिम आयोजित केली आहे. सदर मोहिमेचे अनुषंगाने गोपनिय बातमीदार मार्फ़त खात्रीशीर माहिती मिळाली कि, कोरोची गावचे हददीत एक इसम मेफ़ेड्रान (एम डी) ड्रग्ज हा अंमली पदार्थ विक्री करणे करीता घेवुन येणार असलेचे माहिती मिळालेने त्याप्रमाणे वरील अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी सापळा लावुन वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकुर यास ताबेत घेवुन त्याचे कडुन 6,73,200/-रूपये किंमतीचा अवैद्य मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज हा अंमली पदार्थ जप्त करून ताबेत घेतला व वरील आरोपीत याचे विरुध्द वरील कलमा प्रमाने गुन्हा दाखल करणेत आला आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सचिन सुर्यवंशी हे करीत आहेत.
तरी अशा प्रकारे शहापुर पोलीस ठाणे हददीत अंमली पदार्थ विक्री किंवा सेवन करणारे इसमांचे बाबतीत कोणतीही माहिती प्राप्त झालेस पोलीसांना गोपनिय माहिती देवुन मिशन झिरो ड्रग्ज हे अभियान यशस्वी रीत्या राबणेसाठी व अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेसाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक शहापुर पोलीस ठाणे यांनी केले आहे.