सांगली वाहतूक नियंत्रण शाखेने दुचाकी वाहन धारकांनी मोडिफॉय केलेले 70 सायलन्सर जेसीबीने केले नष्ट …

उपसंपादक- रणजित मस्के
सांगली :-सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण शाखा सांगली कडून मोडिफॉय केलेले 70 सायलन्सर आज जेसीबीने नष्ट केले. गेल्या 3 महिन्यात सांगली वाहतूक शाखेने या मोडिफॉय केलेल्या आणि कर्णकर्कश आवाज करत शहरांतून फिरवणाऱ्या दुचाकी गाड्याचे 70 सायलन्सर जप्त केले होते.
या कारवाईतुन जवळपास 1 लाख 58 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला होता. हे मोडिफॉय केलेले 70 सायलन्सर नष्ट करून अशाप्रकारे तरुणांनी आपल्या दुचाकी गाड्यांना मोडिफॉय करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलन्सर बसवू नयेत असे आवाहन सांगली वाहुतक शाखे कडून या कारवाईच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com