7 तोळे दागिने 1 तासात परत मिळवून दिल्याबद्दल- मानपाडा पोलीसांवर कौतुकांचा वर्षांव..

डोंबिवली : दावडी परिसरात रहावयास असणारे गायकवाड हे लग्न समारंभ आटोपून सर्व कुटुंबीय रिक्षाने घरी परतले. मात्र दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिली. रिक्षाचा क्रमांक माहीती नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्वरित सीसीटीव्हीच्या साह्याने रिक्षा शोधून काढली आणि 7 तोळे दागिने शोभा गायकवाड यांना परत केले.

अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसांचे आभार मानले. तर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
डोंबिवली पूर्वेत दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे काल दादर येथे लग्न होते. या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते. लग्न समारंभआटोपून रात्री नऊच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर आले आणि तेथून दावडी येथे घरीजाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांना दावडी येथे सोडून रिक्षाचालक तेथून निघून गेला. घरी गेल्यानंतर त्याना सात तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षाचालक निघून गेला होता. गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा क्रमांक नव्हता. त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अविनाश वनवे यांच्या पथकाने त्वरित तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. या सीसीटीव्हीत ती रिक्षा आढळून आली. रिक्षाच्या वरच्या भागात पांढऱ्या रंगाची पट्टी होती. रिक्षाचा नंबर व त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला.
आधी रिक्षाचालकाने मला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच, त्याने दागिने परत केले आणि पोलिसांनी शोभा गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले.
त्यामुळे अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसांचे आभार मानले आहेत. तर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com