पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून ७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ६,३१,६००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांच्या पितळेची भांडी, ४९ सिलेंडर व गुन्हयात वापरलेले वाहन हस्तगत.

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री बापू चोंगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे एक तपास पथक तयार करून त्यांना घरफोडी थोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.
दिनांक २७/०५/२०१३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी १) जीवन शहाजी रायते रा. दत्तनगर कोडोली सातारा, २) अमर बापूसाहेब देव रा. खोकडवाडी कोडोली सातारा, ३) महेश अंकुश देशमुख रा.हरपळवाडी ता. कराह जि.सातारा, ४) विजय आत्माराम रिटे रा. व्यंकटपुरापेठ सातारा यांनी सुमारे १० महिन्यापूर्वी अतित ता.जि. सातारा येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडावून मधून सिलेंडरच्या टाक्या चोरी केलेल्या आहेत. प्राप्त माहितीच्या अनुशंगाने त्यांनी पो.उ.नि. विश्वास शिंगाडे व त्यांचे तपास पथकात नमुद आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. नमुद तपास पथकाने नमुद आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडे प्राप्त माहितीच्या अनुशंगाने कौशल्यपूर्वक व सखोल विचारपुस केली असता त्यांनी सुमारे १० महिन्यापूर्वी अतित ता. जि. सातारा येथील भारत गॅस एजन्सीच्या गोडावून मधून ३५ सिलेंडरच्या टाक्या व भूगाव येथून १४ सिलेंडरच्या टाक्या चोरी केल्या असल्याचे सांगीतल्याने घरफोडी चोरीचे गुन्हे उपडकीस आले असून त्यांचेकडून १,०१,५००/- रुपये किमतीचे ४९ सिलेंडर व मुन्हयात वारलेले २,००,०००/- रुपये किमतीचे वाहन हस्तगत करण्यात आलेले आहेत.
तसेच पोलीस कोठडी मुदतीत पो.उ.नि. विश्वास शिंगाडे यांचे तपास पथकाने नमुद आरोपींच्याकडे अधिक कौशल्यपूर्वक व सखोल विचारपूस केली असता त्यांनी कोंडवे ता. जि. सातारा, पिंगळी ता.माण जि. सातारा, महिमानगड ता. जि. सातारा, धामणी ता. पाटण जि.सातारा येथे घरफोड्या केल्या असल्याचे सांगीतल्याने नमुद आरोपींच्याकडून नमुद गुन्हयात चोरीस गेलेले ३,३०,१००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांचा पितळेची भांडी हस्तगत करण्यात आलेली असून नमूद आरोपींच्याकडून एकूण ७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून एकूण ६,३१,६००/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, ताया पितळेची भांडी, ४९ सिलेंडर व गुन्हयात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आलेले आहे.
नमुद आरोपींच्याकडून उपडकीस आलेले
अ.क्र.
बोरगाव
पुसेगाप
पोलीस ठाणे
गु.र.नं.व फलम
१८४/२०२२ भाविक ४५४, ४५०, ३८०
२२३/२०१३ भाविक ४५४, ४५० ३८०
दहिवडी
२५/२०२३ भाविक ४५४, ३८० ४१८/२०२३ भादविक ४५४, ३८०
१४/२०२३ भादयिक ४५४, ४५७, ३८०
सातारा तालुका
४५७/२०१२ भाविक ४५७ २८० २८/२०२३ भाविक ४५४, ४५७ ३८०
६.
1s.
मेना
२.
४.
गुन्हे-

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, रवि तेलतुंबडे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार तानाजी माने, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साधीर मुल्ला, मंगेश महाडीक, मोहन नाचण, दिपाली यादव, अंजली लोखंडे, मुनीर मुल्ला, अमोल माने, राकेश खोडके, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, प्रविण कांबळे, स्वप्नील दौंड, सचिन ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, पै सावंत, धीरज महाडीक, सभाजी सालुख, पंकज चैसके, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, प्रकाश वाघ यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू चांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com