63 वर्ष महिलेला जोराचा धक्का देऊन जखमी करून मोबाईल फोन जबरीने चोरी करून पळून जाणाऱ्या 2 आरोपीला एम एच बी कॉलनी पोलिसांनी पाठलाग करून केले जेरबंद. ..

0
Spread the love

एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे गु. र. क्र. 195/2023 कलम 392,34 भादवी

➡️ गुन्हा दाखल: दि.27/04/2023 रोजी

➡️ फिर्यादी नाव व पत्ता: श्रीमती मिनती अबंरीश नंदा वय 63 वर्ष धंदा नाही रा.ठी. राधा विलास अपार्टमेंट रूम नंबर बी. 508, वामन भोईर रोड कांदरपाडा दहिसर पश्चिम मुंबई

➡️ घटनास्थळ: दहिसर स्टेशन रोड बँक ऑफ बडोद्याचे समोर दहिसर पश्चिम मुंबई.

➡️ हकीकत:
यातील तक्रारदार यांना धक्का देऊन पाडले व त्यांच्या हातातील मोबाईल फोन चोरी करून दोन इसम पळून गेले होते, सदर बाबत माहिती प्राप्त होताच एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, हवालदार प्रवीण जोपले,हवालदार संदीप परीट पोलीस नाईक सतीश देवकर पोलीस शिपाई गणेश शेरमाळे यांनी घटनस्थळाला जावून तेथील परिसरातील 15 ते 17 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना आरोपींचे फुटेज मिळाले, त्यावरून गुप्त बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळवून आरोपींच्या ठिकाणावर गेले असता आरोपी यांनी पोलिसांना पाहताच रेल्वे पटरी वरून पळ काढला आरोपींचा पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले व नमुदचा गुन्हा उघडकीस आणला. तसेच त्यांनी मोबाईल जेथे ठेवला त्याबाबत माहिती प्राप्त करून 1 एप्पल कंपनीचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला आहे.

➡️ *तपास* –
आरोपीचा सदर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने सदर गुन्हात त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून एक एप्पल कंपनीचा मोबाईल फोन अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आली.
➡️ अटक आरोपी:
1- रितिक राकेश पटेल वय 19 वर्ष. धंदा नाही ,राठी. गल्ली नंबर 7 गणपत पाटील नगर न्यू लिंक रोड बोरवली पश्चिम मुंबई

2- प्रेम खुशाल सोलंकी वय 19 वर्ष.
धंदा नाही, रा.ठी.राकादादा झोपडपट्टी राज अपार्टमेंट समोर जयवंत सावंत मार्ग दहिसर पश्चिम मुंबई


➡️ आरोपी अटक
दि. 27/04/2023
रोजी

➡️ तपास मार्गदर्शन
1) श्री. सुधीर कुडाळकर वपोनि
एम एस बी कॉलनी पोलीस
ठाणे
2) श्री. सचिन शिंदे पोनि/
गुन्हे एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे.

➡️ तपास पथक:
पोउनि/ अखिलेश बोंबे
पो उ नि मंगेश कांबळे (IO)
पोहवा/990320/जोपळे
पोहवा/050564/परीट
पोना/ 060799/ देवकर
पो.शि. क्र /130229/ शेरमाळे

 

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट