कारची काच फोडून लॅपटॉप चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीतांस २४ तासांत अटक करून ६ गुन्हे केले उघडकीस..

उपसंपादक-रणजित मस्के
नवी मुंबई:– दिनांक १०/०१/२०२४ रोजी सांयकाळी १८:४५ वाजता श्री. अमेव सुनील विचारे यांनी व फिर्यादी यांचे परिचयाचे अभिशेख वैखान यांनी त्यांची कार विज्ञान सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई समोरील रोडवर पार्क केली असता सदर कारच्या खिडकीची काच फोडून फिर्यादी यांचा व अभिषेक बैवान यांचा असे दोन अॅपल कंपनीचे लॅपटॉप चोरुन नेले म्हणुन श्री. अमेय सुनील विचारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाशी पोलीस स्टेशन गुन्हे नोंद क्रमांक १४/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३८०,४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास चालु केला असता गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सी. सी. टी. व्ही फुटेज तपासण्यात आले. व आरोपीतांचे ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील पोलीस ठाणे मधील अभिलेख तपासण्यात आला होता. आरोपी हे घटनास्थळी पायी चालताना दिसुन येत होते. तसेच चोरीस गेलेल्या फिर्यादी यांच्या लॅपटॉपचे लोकेशन बाबत फिर्यादी यांना वारंवार त्यांच्या आय फोनवर माहिती मिळत असल्याने त्या आधारे त्याचे लोकेशन सी.एस.टी. परीसर मुंबई येथे येत असल्याचे माहिती फिर्यादी यांच्याकडुन प्राप्त होताच आम्ही सदर ठिकाणी पोलीस पथकासह खाना झालो दरम्यान सदर लॅपटॉपचे लोकेशन पुन्हा सी.एस. टी. रेल्वे स्थानकाचे आतमध्ये प्राप्त झाल्याने स्थानिक रेल्वे पोलीसांशी संपर्क साधुन तसेच आम्ही सदर ठिकाणी पोहचलो दरम्यान लॅपटॉपचे लोकेशनच्या आधारे स्थानिक पोलीसांनी तीन संशयीत इसमांना ताब्यात घेतले त्यांचेकडे बरेच लॅपटॉप मिळुन आले सदर लॅपटॉपची पाहणी केली असता त्यामध्ये फिर्यादी यांचे ०२ लॅपटॉप मिळाल्याने सदर संशयीत इसमांना व त्यांच्याकडे मिळुन आलेले लॅपटॉप ताब्यात घेवून पोलीस ठाणेस परत येवून त्यांस अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतांकडे केलेल्या तपासादरम्यान ते तमिळनाडु राज्यातुन तिर्ची येथुन आले असल्याचे समजले ते गेले मागील २० दिवस पुर्ण महाराष्ट्रभर फिरत असुन त्यांनी वाशी, नवघर, मुंलुंड, सी.बी.डी, नाशिक, पुणे, पंढरपुर अशा परिसरातुन कारची काच फोडुन चोरी केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन एकुण ०६ गुन्हे उघडकिस आणण्यात वाशी पोलीस ठाणेस यश आले आहे.
उघडकिस आलेले गुन्हे
१) वाशी पोलीस ठाणे गु.र.नं. १४/२०२४ भादवि कलम ३८०,४२७,३४
२) मुंलुंड पोलीस ठाणे (मुंबई शहर) गु.र.नं. ०३/२०२४ भादवि कलम ३७९,४२७,३४
३) नवघर पोलीस ठाणे (मुंबई शहर) गु.र.नं. ०२/२०२४ भादवि कलम ३७९,४२७,३४
४) सी.बी. डी. पोलीस ठाणे (नवी मुंबई) गु.र.नं. ०३/२०२४ भादवि कलम ३७९,४२७,३४
५) सी.बी. डी. पोलीस ठाणे (नवी मुंबई) गु.र.नं. ०४/२०२४ भादवि कलम ३७९,४२७,३४
६) विमानतळ पोलीस ठाणे (पुणे शहर) गु.र.नं. २६/२०२४ भादवि कलम ३७९,४२७,३४
आरोपींचा पूर्व इतिहास पडताळला असता त्यांनी संपुर्ण भारतभर अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
□ आरोपीचे नाव
१) सेनिथील दुरायरजन कुमार आर. डी, वय ४८ वर्षे, रा. ३/१४५, सी, कट्टुर पुनगानुर, श्री. रंगम थालुक, तिरुचिरापल्ली, तामिळनाडु
२) मुर्ती रामासामी चिन्नाप्पन, वय ३० वर्षे, रा. नं.५/७५९, सैलॉन कॉलनी, भारतीवार नगर, विरुवेरूनमुर, टि. के., तिरुचिरापल्ली, तामिळनाडु
३) शिवा विश्वनाथन, वय ४७ वर्षे, रा. पॉडीचेरी

सदर गुन्ह्याचा तपास हा मा. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, मा. सहा. पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर, पोलीस निरीक्षक संजय नाळे. (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि युवराज सालगुडे, सपोनि पवन नद्रि, पोउपनि निलेश बारसे, पो. हवा /१०५४ सुनिल चिकणे, पो.ना. /३१५४ दिलीप ठाकुर, पोशि/३७०८ अमित खाडे, पोशि/ २८२६ गोकुळ ठाकरे, पोशि/३१९२ केशव डगळे व CSMT रेल्वे पोलीस ठाणे येथील नेमणुकीस असलेले पोहवा/काकड, पोशि/राठोड, पोशि/पिसाळ, पोशि/सपकाळे यांनी केला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com