झाड तोडण्यासाठी गेलेल्या लहुलसे गावातील ५६ वर्षीय इसमाचा झाडावरून पडून मृत्यू…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:- ३० डिसेंबर २०२३ रोजी पोलादपूर तालुक्यातील लहूलसे गावच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा पाय घसरला आणि एका 56 वर्षीय इसमाचा झाडावरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नारायण रामचंद्र माचुत्रे राहणार लहूलुसे असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. गावच्या जंगल भागात नारायण हे झाड तोडण्यासाठी गेले असता झाडावरून त्यांचा पाय घसरल्याने ते खाली कोसळले त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली त्यानंतर त्यांना उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात हजर केले असता त्यांचा मृत्यू झाला.
पोलादपूर पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आला आहे.

पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री युवराज म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रुपेश पवार हे संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com