आम्ही घाटकोपरकर प्रतिष्ठानमार्फत घाटकोपर येथे ५० खोके मोफत टोमॅटो वाटपाचे आयोजन…

उपसंपादक – रणजित मस्के
मुंबई. घाटकोपर :- महागाईच्या काळात सर्व सामान्य जनतेला खासकरून आपल्या कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या गृहिणींना दिलासा मिळावा म्हणून आम्ही घाटकोपरकर प्रतिष्ठाण (नियोजित) संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता माता रमाबाई आंबेडकर नगर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, घाटकोपर (पूर्व ) येथे ५० खोके मोफत टोमॅटो वाटप कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे अध्यक्ष अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिस अर्धा किलो टोमॅटो मोफत देण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचा लाभ विभागातील नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com