५० पेक्षा अधिक घरफोडी करणा-या अट्टल गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीसानी केले जेरबंद

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
त्यांचेकडून २३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने, २१२ ग्रॅम चांदी दागिने घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा
एकुण रु. १७,०७,०००/- रु.चा मुद्देमाल केला हस्तगत
दि. ०४/०२/२०२५ रोजी शिवाजीनगर पो.स्टे. हद्दीमध्ये पोउपनि. श्री अजित बडे हे तपास पथकासह पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिवाजीनगर पो.स्टे. गुन्हा रजि. नंबर २१२/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०५ (क), ३३१ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी हा म्हसोबा गेट बस स्टॉप, शिवाजीनगर पुणे येथे थांबलेला असुन त्याने ठिकठिकाणी चो-या केलेल्या आहेत. अशी खात्रीलायक बातमी प्राप्त होताच
सदर बातमी बाबत शिवाजीनगर पो.स्टे. चे वपोनि चंद्रशेखर सावंत यांना कळविली असता, आरोपी संबंवाने मिळाले बातमीचे गांभीर्य ओळखून श्री, सावंत यांनी नियोजनबध्दरीत्या म्हसोबागेट परिसरामध्ये त्याचा शोध घेवून सापळा रचुन त्यास जागीच ताब्यात घेणे बाबतचे आदेश दिले असता त्या प्रमाणे नमुद आरोपी यास सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता हर्षद गुलाब पवार वय ३१ वर्ष रा. गुलाबनगर घोटावडे फाटा, मुळशी जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याचे सॅक मध्ये सोने-चांदीचे दागिने मिळुन आले तसेच घरफोडी करण्याचे साहित्य मिळुन आले. त्यावर त्यास चौकशीकामी शिवाजीनगर पो.स्टे. येथे आणून त्याच्याकडे केले चौकशीमध्ये त्याने गुन्ह्याची कबुली देवुन त्याने अजुन ब-याच ठिकाणी घरफोडी केल्याचे सागितल्याने त्यास सदर गुन्ह्यामध्ये दि. ०४/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपी हर्षद पवार याचेकडे सखोल तपास करता त्याने ठिकठिकाणी रेकी करून पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिपंरी चिंचवड आयुक्तालय मधील विविध पोलीस ठाणेच्याअटक मुदतीमध्ये आरोर्पीकडे केले चौकशीमध्ये आरोपी नामे हर्षद गुलाब पवार हा सन २०२३ मध्ये जामिनावर सुटलेला असून त्याचेवर वेगवेगळ्या ठिकाणी ५१ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे पोलीस सीसीटीव्ही चेक करुन आपल्या पर्यंत पोहचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे ४० ते ५० कि.मी. चा प्रवास करुन येवून घरफोडी करुन तसेच जाताना पुन्हा ४० ते ५० कि.मी. चा प्रवास छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. तसेच घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपविण्या साठी विविध जॅकेट, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत असे. त्यामधून जरी चुकून सिसिटीव्ही कॅमे-यामध्ये त्याची छबी आलीच तर पोलीसांचा तांत्रीक विश्लेषणातून तपास भरकटावा यासाठी मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची अॅक्टींग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच चोरलेले सोने-चांदीचे दागिने विकण्यासाठी सह आरोपी निलकंठ राऊत याची मदत घेत असे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दाखल गुन्ह्यातील तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालया तील विविध पो.स्टे. अंतर्गत झालेल्या घरफोड्यातील व चोरीतील एकूण २३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिणे, २१२ ग्रॅम चांदी, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेले कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, वेगवेगळ्या कुलपांच्या एकुण ४९ चाव्या इत्यादी मिळून साधारण १७ लाख रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सहआयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि. १ श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, सहा. पोलीस निरीक्षक संजय पांढरे, पोलीस उप-निरीक्षक अजित बडे, तसेच पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर वलटे, सचिन जाधव, प्रविण दडस, सुदाम तायडे, कृष्णा सांगवे यांनी केलेली आहे.