ट्यूशनला जायचे नाही म्हणून पळुन गेलेल्या 5 वर्षाच्या मुलाला निर्भया पथकाने शोधून केले पालकांच्या स्वाधीन…
प्रतिनिधी-रणजित मस्के
पवई : पोलीस ठाणे पवई पोलीस ठाणे, मुंबई.
निर्भया पथक कामगिरी अतिशय उल्लेखनीय कामगिरी
दिनांक 20/12/2022 रोजी 09:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
घटनास्थळ – शिव शक्ति नगर, तुंगा गाव, पवई, मुंबई
निर्भया अधिकारी -पोलीस उपनिरीक्षक सविता माने व Wpn बागवान, HC सानप व बीट मार्शल 2- HC वर्पे

संपूर्ण हकीकत अशी की दिनांक 20/12/22 रोजी पवई पोलीस ठाणे येथे श्री राजकुमार गिरी यांनी त्यांचा लहान मुलगा ऋषभ गिरी वय – 5 वर्षे हा राहते घरा समोरून ट्यूशन जाण्या साठी बाहेर आला. त्याची आई दरवाजा लॉक करे पर्यंत ऋषभ त्यांचे आईचा हात सोडून पळून गेला. त्यांचे सांगणे प्रमाणे तात्काळ त्यांचे राहते परिसर येथे बीट मार्शल व मोबाईल 5 वाहने पाठविण्यात आली. तसेच इतर पोलीस ठाण्यातील निर्भया पथक यांचे ग्रुप वर संदेश देण्यात आला. त्यानंतर Psi पिलाणे यांना सदर मुलगा साकिनाका पोलीस ठाणे येथे मिळुन आल्याची माहिती मिळाली.

त्या अनुशंगाने मोबाईल 5(निर्भया पथक) यांच्यासह जाऊन नमूद मुलाची ओळख पटवून त्यास पालकांसह पवई पोलीस ठाणे येथे घेऊन आले. सदर मुलास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यास ट्यूशन ला जायचे नसल्याने तो पळून गेला, अशी माहिती मिळाली. तसेच त्याचे पालकांकडे विचारणा केली असता त्यांनी देखील कोणाविरुद्ध संशय किंवा तक्रार नसल्याचे सांगितले.
सदर लहान मुलास त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बुधन सावंत पवई पोलीस ठाणे यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com