मध्यप्रदेश येथील महाराष्ट्रात शस्त्रे विकणारा तस्कर याचेकडून ५ पिस्टल व १० जिवंत काडतूस असा एकूण ३,२७,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक -रणजित मस्के
सातारा : – श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली माहे नोव्हेंबर २०२२ पासून सातारा जिल्हयामध्ये एकूण ३२ देशी बनावटीची पिस्टल व ४० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. परंतू सदरची पिस्टल व काडतुसे कोतून महाराष्ट्र राज्यामध्ये आणली जात होती. याबाबत तपासामध्ये माहिती प्राप्त होत नसल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्याबाबत माहिती प्राप्त करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये देशी बनावटीची शस्त्रे पुरविणाऱ्या लोकांची माहिती प्राप्त करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे तपास पथक कार्यरत असताना त्यांना गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषनाद्वारे माहिती प्राप्त झाली की, महाराष्ट्र राज्यामध्ये बेकायदेशीर विक्री करीता येणारी देशी बनावटीची पिस्टल ही मध्यप्रदेश येथून पुरविली जात आहेत, त्याअनुशंगाने तपास पथक माहिती काढत असताना दि.१३/०५/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, मध्यप्रदेश येथील बेकायदा देशी बनावटीच्या पिस्टल महाराष्ट्रात विक्री करणारा महेंद्र प्रकाश पावरा रा.उमटी ता. चोपड़ा जि.जळगाव हा सातारा ते पुणे जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ येथे चिरमाडे गावचे हद्दीत पिस्टलची विक्री करण्याकरीता येणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे विशेष पथकास कारवाईच्या सूचना दिल्या. विशेष पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाण विरमाडे ता. वाई जि.सातारा गावचे हद्दीतील सातारा ते पुणे जाणारे हायवे रोडचे सव्र्हस रोडवर हॉटल महाराजचे समोर सापळा लावून तीन इसमांना ताब्यात घेवून त्यापैकी एका इसमाच्या ताब्यातून ३,२७,०००/- रुपये किमतीची ५ देशी बनावटीची पिस्टल व १० जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून जप्त करून त्यांचे विरुद्ध भुईंज पोलीस ठाणे गु.र.नं. १६४/२०२३ भा.ह.अ.क. ३(१), २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. माहे नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ३७ देशी बनावटीची अग्निशस्त्रे व ५० काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, तानाजी माने, अतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, मोहन नाचण, सावीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, मुनीर मुल्ला, गणेश कचरे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, स्वप्नील दौड, सचिन ससाणे, केतन शिंदे, मयुर देशमुख, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.आरोपींची नावे – १) महेंद्र प्रकाश पावरा वय २२ वर्षे रा.उमर्टी ता. चोपडा जि. जळगाव २) वैभव बाळासो वाघमोडे वय २१ वर्षे रा. बलगवडे ता. तासगाव जि. सांगली, ३) अशोक विठ्ठल कार्वे वय ५८ वर्षे रा.येरवळे ता.कराड जि. सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com