५ वे बायकोचा गळा दाबून खून करून तिच्या कमरेला दगडांची गोणी बांधुन पाण्याचा ओहोळात सोडणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :– दिनांक ०२/०९/२०२४ रोजी सावरे ता. जि. पालघर येथील पोलीस पाटील हरिश्चंद्र दामजी बरडे यांनी मनोर पोलीस ठाणे येथे फोन करुन कळविले की, सावरे, वाणीपाडा ता.जि.पालघर येथील जयराम शंकर बोंड यांचे फॉरेस्ट प्लॉटच्या बाजुला ओहळाच्या पाण्यामध्ये एक महीला मयत स्थितीत पाण्यावर तरंगत आहे. सदरची माहिती मनोर पोलीसांना मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रणवीर बयेस आणि मनोर पोलीस ठाण्यातील इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी जावून पाहीले असता वरील नमूद ठिकाणी एक महीला मयत स्थितीत पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्याने गावातील काही लोक आणि अॅम्ब्युलन्स चालक अकील शेख रा. मनोर यांचे मदतीने सदर मयत महीलेचे प्रेत हे ओहोळाच्या पाण्यातुन बाहेर काढले असता सदर महीलेने एक काळया रंगाचा टॉप आणि लाल रंगाचा स्कर्ट घातलेला असुन तिचे वय अंदाजे २२ वर्ष असुन तिच्या गळयाला ओढणीने आवळुन तिला जिवे ठार मारुन एका सफेद रंगाची गोणीमध्ये दगड टाकुन ती गोण तिच्या कमरेला दोरीने बांधुन त्या ओहोळाच्या पाण्यात टाकुन दिलेली असल्याचे आढळून आले.


पोलीसांनी घटनास्थळी तपास करुन सदर मयत महीलेची ओळख पटविली असता. तिचे नाव सुष्मिता प्रविण डावरे वय २२ वर्ष रा. सावरे वाणीपाडा, सद्या सावरे बरडेपाडा हद्दीत फॉरेस्ट प्लॉट येथील राहते घर ता.जि. पालघर असे समजून आले. गावचे पोलीस पाटील हरिश्चंद्र दामजी बरडे, वय ५० वर्ष, रा. सावरे, बरडेपाडा पोस्ट-दुर्वेस, ता.जि. पालघर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मनोर पोलीस ठाणे २७६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कायदा कलम १०३(१), २३८ प्रमाणे दिनांक दि.०२/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार केली. त्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपींकडे कसून चौकशी करून कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपीत नामे १) संदीप रामजी डावरे, वय ३५ वर्ष, व्यवसाय- मजुरी, २) सुमन उर्फ सकु सदु करबट वय ४८ वर्ष, व्यवसाय मजुरी दोन्ही रा. सावरे, वाणीपाडा, ता जि पालघर यांनी गुन्हयातील मयत महिला ही आरोपींचे भावाची पाचवी बायको असुन तिच्यावरुन घरामध्ये कौटुबिंक वाद होत होते.

सदर मयत महिला आरोपीत यांना तिचे घरातुन निघुन जाणेबाबत वारंवार सांगत होती. त्यांच्यात असलेल्या नेहमीच्या वादातुन आरोपीत यांनीसंगनमताने मयत महिलेचा ओढणीने गळा आवळून खुन करून त्यांचा साथीदार आरोपी क्र. ३) हरी रामा गोवारी, रा. खोंडीपाडा, सावरे, ता. जि. पालघर याच्या मदतीने मयत सुष्मिता हीच्या मृतदेहाला दोन प्लॅस्टीकच्या गोण्यांमध्ये दगडं भरुन त्या गोण्या मयतेच्या कमरेला दोरीने बांधुन तिचा मृतदेह ओहोळाच्या पाण्यात टाकुन दिला असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हयातील वरील तिन्ही आरोपींना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली. त्यानंतर वरील आरोपीत यांचेकडे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या अधिक सखोल तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपीत नं १ व २ यांनी मयत महिला हिची दीड वर्षाची मुलगी प्रतिभा हिचा गळा आवळुन ठार करुन तिला सुध्दा आरोपी क्रमांक ३ याच्या मदतीने एका सफेद रंगाच्या गोणीमध्ये दगडं भरुन त्या गोणीला दोरीच्या सहाय्याने बांधुन त्या मुलीला सावरे वाणीपाडा ता. जि. पालघर येथील ओहोळाच्या पाण्यामध्ये फेकुन दिले आहे.

त्यानुसार तपासात मुलगी प्रतिभा प्रविण डावरे वय दीड वर्ष हिचा मृतदेह तपासात हस्तगत करुन पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, मनोर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/रणवीर बयेस, सपोनि /केशव राठोड, पोउपनिरी/विशाल शिर्के, पोउपनिरी/संग्राम पाटील, पो.हवा/११४६ राजेश काचरे, पो.हवा/७९० निलेश शिंगाडे, पो.हवा/१००६ राहुल सावंत, पो.हवा/६५२ आयुब शेख, मपोहवा /६१९ वंदना राव, मपोहवा/२८७ ज्योत्सना दळवी, पो.ना/८८३ उदय चौधरी, पो.ना/७८८ संदीप सोनवणे, पो.ना/८५९ प्रविण थोटगा, पो.शि/२९६ कल्पेश पाटील, पो.शि/१२५४ किरण लाड, पो.शि/९४१ नागेश निळ, पो.शि/१२१७ प्रविण सांगळे सर्व नेमणुक मनोर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट