४९ वा कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा- २०२४ दि.२८ व २९ डिसेंबर रोजीचा निकाल जाहीर…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.:-

४९ वी कोंकण परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पालघर येथे दिनांक २८/१२/२०२४ ते ०३/०१/२०२५ दरम्यान पार पाडली जात आहे.

४९ व्या कोंकण परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये १) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, २) मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, ३) ठाणे ग्रामीण, ४) सिंधुदुर्ग, ५) रायगड, ६) रत्नागिरी, ७) पालघर या पोलीस घटकाकडील सघांचा समावेश आहे. सदर स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, कुस्ती, जुडो, तायक्वांदो, वु-शु, बॉक्सींग, हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी व जलतरण या खेळांचा समावेश असून सदर स्पर्धेकरीता नवी मुंबई आयुक्तालयाचे १९१, रत्नागिरी पोलीस दलाचे ६५, मिरा भाईंदर, वसई-विरार आयुक्तलयाचे १५४, ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे १११, रायगड पोलीस दलाचे १५१, सिंधुदुर्ग पोलीस दलाचे ०३ १०१ व पालघर पोलीस दलाचे १४० असे एकुण ९१३ पोलीस खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
सदर क्रिडा स्पर्धा या संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, सुहास व्हनमाने, जिल्हा क्रिडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली आहे.

क्रीडा स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..!


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट