खुनाच्या गुन्ह्यातील महिलेसह एकाला ४८ तासांत धाडले तुरुंगातमुंब्रा पोलिसांची कौतुकास्पद कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे :– पूर्ववैमनस्यातून मुंबईच्या व्यक्तीची मुंब्रा परिसरात हत्या केल्या प्रकरणी महिलेसह एका पुरुषाला अटक करण्यात आली. या गुन्ह्याची अवघ्या ४८ तासांत उकल करण्यात आली.

३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा पोलीस स्टेशन ह‌द्दीतील आनंद कोळीवाडा परिसरातील लक्ष्मी निवास इमारतीचे ४ मजल्यावर इसम नामे दामोदर कोडींबा पगडे (रा. विजयकुमार दळवी नगर, दादर, मुंबई) या इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळाले. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यु नोंद क. २९६/२०२४ भारतीय नागरीक सुरक्षा अधि. १९४ प्रमाणे दाखल करून मयताचे प्रेत पोस्ट मार्टमकामी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालात पाठविण्यात आले. मयताचे प्रेतावर दिनांक ३१/०८/२०२४ रोजी पोस्ट मार्टम करतेवेळी वैद्यकिय अधिकारी यांना मयताचे अंगावर कोणत्यातरी धारदार हत्याराने गळ्यावर, छातीवर, पाठीवर जखमा असल्याचे दिसल्याने त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

त्यानुसार मयताचा मोठा भाऊ बाळु कोंडीबा पगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क. १८३६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २६८,६१(२), ३११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावर आरोपीने कोणताही पुरावा सोडला नसल्याने आरोपी निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. या गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमुन मयताचे मोबाईल नंबरचे सीडीआर/एसडीआर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण केले असता मृताचे व्हॉट्सअप कॉलव्दारे कोणाच्या तरी संपर्कात असल्याचे दिसुन आले. त्यानुसार मयताचे कुटूंबियांकडुन माहिती घेवुन दादर रेल्वे स्टेशन ते मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता एक अनोळखी संशयीत महिला व पुरुष मयतास मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर भेटल्याचे दिसुन आले. त्याअनुषंगाने २ सप्टेंबर २०२४ रोजी गुप्त बातमीदार यांना संशयीत महिला व पुरुष यांचे फुटेज दाखवुन ओळख पटवुन मिळालेल्या माहितीच्या आधारे व संशयीत महिला व पुरुष यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणावरून शोध घेतला असता मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरातील ख्वाजा पॅलेस इमारतीत महिला सुप्रिया मच्छीद्र वाघमारे (वय २६ वर्ष, राह. विजयकुमार दळवी नगर, दादर, मुंबई) व आमीर नुरमोहम्मद शेख (वय ३३ वर्ष, राह. ख्वाजा पॅलेस, मुंब्रा, ठाणे) हे मिळुन आले.

त्यांना चौकशी कामी पोलीस स्टेशनमध्ये आणुन गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी पूर्ववैमनस्यातून गुन्हा केल्याचे कबूल केल्याने नमुद दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींच्या पोलीस कोठडी तपासादरम्यान आरोपींतांकडुन मयताचा मोबाईल, सोन्याची अंगठी तसेच गुन्हयात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहेत.

या गुन्ह्याच्या तपासात पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग, उत्तम कोळेकर यांनी दिलेल्या सुचना व आदेशाप्रमाणे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक/नितीन पगार (प्रशा), पोलीस निरीक्षक / राजू पाचोरकर (का.व सु.) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनिरी / अजय कुंभार, सपोनिरी/उमेश कोरडे, पोहवा/रहिश जाधव, पोहवा /अजिज तडवी, पोशि/कृष्णा आव्हाड व पोशि / अजिंक्य महाडीक यांनी केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक / नितीन पगार (प्रशा) हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट