सांगली पोलीस मुख्यालय येथे ३८ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२४ उत्साहात संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-३८ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२४ च्या स्पर्धा पोलीस मुख्यालय, सांगली येथे दि. २५.०९.२०२४ ते दि. ३०.०९.२०२४ च्या कालावधीत पार पडल्या. सदर स्पर्धेत सांगली विभाग, मिरज विभाग, जत विभाग, तासगाव विभाग, विटा विभाग, इस्लामपुर विभाग व पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १५० पुरुष खेळाडू व ५० महीला खेळाडू असे एकूण २०० खेळाडू सहभागी झाले होते.







आज दि. ३०.०९.२०२४ रोजी ३८ वी सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२४ चा समारोप समारंभ प्रमुख पाहुणे मा. श्री. डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांचे उपस्थित पार पडला.
सांगली पोलीस क्रिडा स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो खो, या सांघिक खेळाबरोबरच अॅथलेटीक्स, कुस्ती, ज्युदो, बॉक्सींग, जलतरण, वेटलिफ्टींग इत्यादी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत. या क्रिडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे मा. श्री. डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली, मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम यांचे हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.
सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा २०२४ च्या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण पुरुष व महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे.
सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा सन २०२५ च्या पुढील स्पर्धा घेण्याचा बहुमान उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज यांना प्रमुख पाहुणे मा. श्री. डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
आजच्या या समारोप कार्यक्रमावेळी महिलांची संगीत खुर्ची व लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या बक्षीस समारंभ कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितू खोखर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, विमला एम, सांगली विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रणिल गिल्डा, मिरज विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनिल साळुंखे, जत विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगेश चव्हाण, इस्लामपूर विभाग, पोलीस उपअधीक्षक (गृह), दादासाहेब चुडाप्पा, पोलीस मुख्यालय, सांगली, पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सांगली व मिरज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, राखीव पोलीस निरीक्षक, बाळू आलदर, महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक, पुष्पा घनवट, स्पोर्टस इनचार्ज धनंजय राऊत व पोलीस मुख्यालयकडील स्टाफ, विविध खेळ प्रकारातील पंच व खेळाडू उपस्थित होते. सदर क्रिडा स्पर्धा पार पाडण्याकरीता पोलीस मुख्यालयातील
कवायत शिक्षक व अंमलदार यांचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कुटुंबिय, नागरीक व विदयार्थी हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय कडने यांनी केले.
आतापर्यंत सांगली पोलीस दलातील २१ पोलीस अंमलदार खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रिडा स्पर्धेमध्ये एकूण ३७ पदक प्राप्त केले असून त्यामध्ये ०७ सुवर्ण, ११ रौप्य आणि १९ कांस्य पदक पटकावलेले आहेत.
३८ वी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२४ विजेते संघ
अ.नं.
१.
खेळाचा प्रकार
फुटबॉल
विजेता
मुख्यालय विभाग
२.
हॉकी
इस्लामपुर विभाग
३.
हॉलीबॉल-महीला
सांगली विभाग
४.
हॉलीबॉल-पुरुष
मुख्यालय विभाग
५.
बास्केटबॉल-महीला
मिरज विभाग
६.
बास्केटबॉल-पुरुष
मिरज विभाग
७.
हँडबॉल
इस्लामपुर विभाग
८.
कबड्डी-महीला
मुख्यालय विभाग
९.
कबड्डी-पुरुष
सांगली विभाग
१०.
खो-खो महीला
मुख्यालय विभाग
११.
खो-खो पुरुष
तासगाव विभाग
१२.
क्रॉसकंट्री-महीला
जत विभाग
१३.
क्रॉसकंट्री-पुरुष
मुख्यालय विभाग
१४.
बेस्ट डिसीप्लीन टीम
विटा विभाग
१५.
बेस्ट अॅथलेटीक्स महीला
मपोशि/१४८६ कल्पना काचरा
१६.
बेस्ट अॅथलेटीक्स- पुरुष
पोशि/४५५ साहील शिंदे
१७.
जनरल चॅम्पीयनशीप- महीला
१८.
जनरल चॅम्पीयनशीप पुरुष
मुख्यालय विभाग
मुख्यालय विभाग
दिनांक ३०/०९/२०२४ रोजीच्या स्पर्धा
महीला संगीत खुर्ची
१. माधवी विजय घस्ते २. तेजस्वीनी अमित पाटील
मुले
३० मीटर धावणे (०५ वर्षाखालील मुले/मुली)
१. श्वयंभु प्रज्योत चौगुले
२. शिवांश प्रदीप सांवत ३. निशांत सुभाष सुर्यवंशी
मुली
१. संस्कृती अमर नरळे
२. प्रणिती अमोल नलवडे
३. अनम चौदशहा मुजावर
३० मीटर धावणे (०८ वर्षाखालील मुले/मुली)
मुले
१. श्री नामदेव कमलाकर
२. पृथ्वीराज राजेंद्र कुडलापगोळ
३. विराज शक्ती गायकवाड
मुली
१. आरोही जगनाथ मदने
२. विभावरी विकास पाटील
३. सुवर्धा गिरीश पाथरवट
५० मीटर धावणे (१० वर्षाखालील मुले/मुली)
मुले
१. आर्यन रोशन मडावी
२. प्रचोद्य धनाजी देशमुख
३. आदित्य रणजीत जाधव
मुली
१. श्रावणी मिलिंद बामणे
२. कस्तुरी सुहास मोहीते
३. आराध्या मंगेश करांडे
८० मीटर धावणे (१२ वर्षाखालील मुले/मुली)
मुले
मुली
१. सुफीयान समीर सनदी
२. प्रणित नामदेव कमलाकर
३. वरद संजय कोळी
१. कस्तुरी सुहास मोहीते
२. तनिष्का सुभाष सुर्यवंशी
३. प्रांजली पांडुरंग महाले
मा. कलेक्टर साहेब व जनता प्रथम क्रमांक
१. पोशि/४५५ साहील शिंदे (पोलीस मुख्यालय)
२. पोना/११९१ अविनाश लाड (आर्थीक गुन्हे शाखा)
३. पोशि/३९१ महेश सुतार (पोलीस मुख्यालय)
रस्सीखेच
१०० मीटर धावणे पुरुष
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com