कोकण कडा मित्र मंडळ महाड-रायगड तर्फे किल्ले रायगड येथे ‘३५० किल्ल्यांवर ध्वजारोहण मोहीम’ मोठ्या उत्साहात संपन्न

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:- श्रीशिवराज्याभिषेकदिनाचे ३५०व्या वर्षानिमित्ताने ७५व्या प्रजासत्ताकदिनी कोकण कडा मित्र मंडळ महाड च्या वतीने अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आयोजित महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर ध्वजारोहण मोहिमेअंतर्गत रायगड किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले.

प्रतिवर्षी रायगड किल्ल्यावर प्रशासनाकडून ध्वजारोहण केले जात असते, याच कार्यक्रमात स्वराज्याच्या राजधानी ठिकाणी या कार्यक्रमात सामील होऊन हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर महाड तालुक्याचे नायब तहसीलदार मा. श्री. भाबड साहेब यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतासह राष्ट्रीय ध्वजास सलामी देण्यात आली. या कार्यक्रमास डॉ. राहुल वारंगे, सचिव-अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ तसेच श्री.संतोष शिवराम जनाठे,पालघर यांची उपस्थिती लाभली. डॉ. वारंगे यांनी उपस्थित सर्व राष्ट्रभक्त नागरिकांना या उपक्रमाचा उद्देश तसेच गड किल्ले संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.

हि मोहीम यशस्वी करण्यासाठी कोकण कडा मित्र मंडळाचे सदस्य श्री.सचिन शेवरकर, श्री.कैलास चव्हाण, श्री. रोहित पवार, श्री. प्रकाश दाभेकर, श्री. कल्पेश रजपूत, श्री. पंकज चौधरी, कु. सुदेश जाधव तसेच सह्याद्री मित्र महाडचे सदस्य श्री. समीर गोरे, रोशन भोपी, संकेत शिंदे, अर्णव शेठ यांनी सहभाग घेतला. राष्ट्रगीत, शिवप्रतिज्ञा, भारतमातेच्या आणि शिवछत्रपतींच्या जय घोषात ही मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट