नवी मुंबईत 32 महिला स्वच्छताकर्मींच्या उल्लेखनीय कामाचा हिरकणी पुरस्काराने विशेष सन्मान…
उपसंपादक – रणजित मस्के
नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेमधील मानांकनात येथील स्वच्छताकर्मींचा सर्वाधिक महत्वाचा वाटा असून त्यामध्ये स्वच्छताकर्मी महिलांचीही महत्वाची भूमिका असल्याचे मत व्यक्त करीत त्यांच्या कार्याचा बहुमान करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी यामुळे हिरकणी असणा-या आमच्या महिला स्वच्छताकर्मींना अधिक चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळेल असे सांगितले.









नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने हिरकणी फाऊंडेशन व लेक माहेरचा कट्टा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी भवन, सीबीडी बेलापूर येथे आयोजित नवी मुंबईची हिरकणी या स्वच्छता दुतांच्या विशेष सन्मान कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीम. हेमांगिनी पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी श्रीम. ज्योती देशमुख, राज्यकर आयुक्त विभागाच्या अधिकारी श्रीम. स्वाती थोरात, वन विभागाच्या अधिकारी श्रीम. सपना बिरारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशाल माने आणि इतर मान्यवरांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32 महिला स्वच्छताकर्मींना मानाची साडी, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री. विजय नाईक यांनीह उपस्थितांना स्वच्छतेविषयी माहिती देत सामुहिकरित्या स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. या निमित्ताने विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणा-या 24 सेवाभावी संस्थांनाही गौरविण्यात आले.
‘गौरव तुमचा, आनंद आमचा’ असे म्हणत हिरकणी फाऊंडेशनच्या अध्यक्ष श्रीम. जयश्री शेलार व लेक माहेरचा कट्टा ग्रुप संस्थेच्या प्रमुख श्रीम.सारिका प्रमोद ढाणे आणि त्यांच्या सर्व सहका-यांनी अत्यंत उत्साहने या समारंभाचे आयोजन केले होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com