उस्मानाबाद मध्ये राहणाऱ्या ३ वर्षाच्या चिमुकल्याला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमार्फत वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रिया केल्याबाबत विशेष आभार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

उस्मानाबाद:-उस्मानाबाद येथे राहत असणाऱ्या कु.परमेश्वर श्रीधर शिंदे या तीन वर्षाच्या लहान मुलाच्या हृदयामध्ये छिद्र असल्याकारणाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईमधील वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वाडिया हॉस्पिटल मार्फत 3 लाख 50 हजार इतका खर्च सांगितला.

परंतु इतका खर्च या कुटुंबाला परवडणारा नव्हता. या कुटुंबाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे बोरवली तालुका अध्यक्ष श्री संजय मेहता यांच्याशी संपर्क केले.

तातडीने संजय मेहता यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या मुंबई कार्यालयात श्री रितेश सुनील गोसावी यांची रुग्णांच्या नातेवाईकांची भेट करून दिली. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना श्री रितेश गोसावी यांनी तातडीने वाडिया हॉस्पिटलच्या ट्रस्टीशी संपर्क करून 3 लाख 50 हजार इतक्या खर्चाचे बिल माफ करून लहान मुलाची शस्त्रक्रिया मोफत मध्ये करून देण्यात आले.

महाराष्ट्रातील उस्मानाबाद येथे राहत असलेल्या या कुटुंबाच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमार्फत मदत मिळाली त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल भैया दुबाले, श्री रितेश गोसावी मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, श्री संजय मेहता बोरवली तालुका अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट