3 वर्षाच्या हरवलेल्या मुलाच्या पालकांना शोधण्यात शिवाजीनगर पोलीसांना अखेर यश…

अंबरनाथ: महालक्ष्मीनगर परिसरात रहावयास असणारा कन्हैया विनोद कुमार वर्मा 3 वर्षाचा मुलगा विभागातील नागरिकांना सापडला.

परंतू तो मुलगा आपलं घर दाखवू न शकल्याने त्याच्या पालकांना शोधण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर समाज माध्यमांवर या मुलाचा फोटो पसरताच या मुलाचे आईवडील सापडले.
कन्हैया विनोद कुमार वर्मा हा काल सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास कन्हैया वर्मा घराबाहेर खेळता-खेळता दिशाभूल झाला आणि घरापासून दुर निघून गेला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कन्हैयाला पोलीस चौकीत घेऊन आले आणि तसंच त्याला विचारपूस केली असता त्याला काहीच माहिती नसल्यामुळे पोलिसांनी बीट मार्शल आणि एका महिला पोलीस कर्मचारी यांना या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. मात्र दिवसभर शोधूनही त्याचे नातेवाईक सापडू शकले नाही.
अखेर पोलिसांनी कन्हैया याचा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल केला आणि श्रीमती ज्योती डोंगरे ही महिला या मुलाच्या परिचयातली असल्याने तिने त्याच्या आई वडिलांना कळवले.
कन्हैय्या याचे आई-वडील कामावर गेले असताना कन्हैया हा त्याच्या 6 वर्षीय बहिणी सोबत घरात एकटाच होता. संध्याकाळी आई वडील घरी परत आल्यावर कन्हैया बेपत्ता झाल्याच त्यांना ज्योती डोंगरे यांनी सांगितले. त्यानंतर ते शिवाजी नगर पोलिस ठाण्यात पोचले असता कन्हैय्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्री. मधुकर भोगे यांनी त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले.
फाटो सोशल मीडियावर व्हायरल केला तरीसुद्धा मुलगा काही सांगू शकत नसल्याने त्याचा पालकांचा शोध घेणे अवघड वाटत होते. मात्र अंबरनाथकरांनी या मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून एका दिवसातच त्याच्या पालकांना शोधण्यात सहकार्य केले आणि पोलीसांचे आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com