रेल्वेच्या महत्वपूर्ण सिग्नल प्रणालीचे रीले चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांनागंगाझरी पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल गोंदिया यानी ठोकल्या बेड्या. ..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया : – ♻️.याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 14.10.2023 रोजी रात्री 23.30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लेव्हल रेल्वे क्रॉसिंग गेट 515, मौजा- दांडेगाव, ता. जिल्हा गोंदिया येथील रिले रूमचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून रेल्वे रॅक मधील 41 रिले *एकूण किंमती – 98,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यावरून रेल्वे सुरक्षा बल, गोंदिया येथे अपराध क्रमांक 12/2023 रेल्वे मालमत्ता (अवैध ताबा) कायदा 1966 कलम 3(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

🔸अशा रेल्वेच्या महत्वपूर्ण सिग्नल प्रणालीच्या रिले चोरीच्या घटनेमुळे काही काळाकरीता हावडा - नागपूर रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक व्यवस्था खोळंबली व रेल्वेची मोठी दुर्घटना होता होता थोड्क्यात टळली.

🔹 सदर रेल्वेच्या सिग्नल प्रणाली रिले चोरीच्या गंभीर घटनेबाबत रेल्वे प्रशासनातील वरीष्ठ रेल्वे बोर्ड अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनातील जिल्हा पोलीस अधीक्षक, यांना वेळीच माहिती देण्यात आली. व घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल, आणि मदती करिता पोलीस ठाणे गंगाझरी येथील पोलीस पथक रिले चोरांच्या शोधाकरिता नेमण्यात आले होते..

♻️ मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशन गंगाझरीचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रेल्वे सुरक्षा बलच्या स्टाफला मदत केली. रेल्वे सुरक्षा बल व पोलीस स्टेशन गंगाझरी पोलीस पथक असे संयुक्तरित्या आरोपी शोध मोहीम राबविण्यात येऊन कार्यवाही करून आरोपी इसम नामे-
➖➖➖➖➖➖➖➖
1). सलाम रफिक शेख, वय 24 वर्ष, रा. गंगाझरी,

2). जितेंद्र उर्फ जितू नरेंद्र गिरी, वय 34 वर्ष, रा. गंगाझरी,

3). ऋषभ उर्फ सोनू शशिकांत सिंह, वय 24 वर्ष, रा. गंगाझरी व एक विधी संघर्ष बालक

➖ अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना विश्वासात घेऊन त्यांच्या कडे प्रस्तुत गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता, त्यांनी प्रस्तुत गुन्हा केल्याचे कबूल केले….. रेल्वे सुरक्षा बलचे अधिकारी, अंमलदार यांनी नमूद आरोपींना प्रस्तुत गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत केलेला आहे.

🔸 रिलेचे काय महत्वपूर्ण कार्य असते समजुन घेवूया—-

   ▪️ आरोपींनी रिले रूममधून चोरलेले रिले हे रेल्वेच्या सिग्नल प्रणाली मध्ये वापरले जातात. त्याच्यामुळे सिग्नलचे कार्य चालू राहते.... परंतु सदरचे रिले हे सिस्टीम मधून काढल्यामुळे रेल्वेचे सर्व सिग्नल बंद पडले....आणि यामुळे एखादी मोठी रेल्वे दुर्घटना घडून त्यात मोठी जीवित किंवा वित्तहानी झाली असती... परंतु रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सदरची घटना टळली.... सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. वरिष्ठांच्या निर्देश सूचना प्रमाणे पोलीस स्टेशन गंगाझरीच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तत्परतेने सूत्रे हलवून गोपनीय सूत्रांकडून चोरट्यांबद्दल माहिती संकलित करून गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले......

🔹 सदरची संयुक्त कार्यवाही रेल्वे पोलिस प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी बोर्ड अधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे पोनि श्री. महेश बनसोडे, सफौ मनोहर अंबुले, पोहवा सुभाष हिवरे, भूपेश कटरे, पोशि प्रशांत गौतम तसेच रेल्वे सुरक्षा बल चे पोनि अनिल पाटील, नंदबहादूर, विनोदकुमार तिवारी, पोउपनि राहुल कुमार, दुबे, मेश्राम, सफौ एस. सिडाम, पोहवा रायकवार, पोशि नसीर खान, यांनी कारवाईत सहभाग घेतला. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलचे वरीष्ठ अधिकारी डी.आय.जी श्री. भवानी शंकर नाथ व मंडल सुरक्षा आयुक्त श्री. आर्य यांनी भेट दिली.

♻️ गोंदिया जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांना आवाहन– –

🔹रेल्वेच्या मालमत्तेची किंवा त्याच्या वेगवेगळ्या साहित्याची चोरी करणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारच्या रेल्वेच्या साहित्याच्या चोरीमुळे रेल्वे ची मोठी दुर्घटना घडू शकते…. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेची चोरी केल्याचे वा करताना आढळून आल्यास त्याबद्दल तात्काळ गोंदिया रेल्वे पोलिससांना तसेच गोंदिया जिल्हा पोलिसांना माहिती देणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे……….. जिल्ह्यांतील सुज्ञ नागरिकांनी नियंत्रण कक्ष गोंदिया दूरध्वनी क्रमांक 07182-236100 यावर किंवा डायल 112 यावर संपर्क साधावा.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट