घरफोडी चोरी करणारे ३ सराईत आरोपी जेरबंद ३८,६४,०००/- रु चा ५१० ग्रॅम वजनाचे सोने व १६६५ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुद्देमाल केला हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-पोलीस स्टेशन

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाय

सांगली ग्रामीण पोलीस ठाणे

गु.र.नं.२५०/२०२४, बी. एन. एस. २०२३ कलम ३३१(३) ३३१ (४)

प्रशांत प्रदिपकुमार आडसुळे, रा. पराडाईज हाउस, हरीपुर, सांगली.

३०५ (ए), प्रमाणे.

माहिती कशी प्राप्त झाली

गु.प.ता वेळ

मु.दा.ता वेळ

पोना / १५२९ संदीप नलावडे, पोहेकों/११६ दरिया बंडगर

दि.०३/०८/०२४ रोजी सायकाळी १८.०० वा ते दि. ०५/०८/२०२४ रोजीचे सकाळी ०९.१५ वा चे दरम्यान

ता. ०५/८/२०२४ रोजी २१.२० वा.

पोहेकी १७३३ अरुण पाटील

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, रथा. गु. अ. शाखा, पोहेकों / दरिया बंडगर, सागर लवटे, अरुण पाटील, अमर नरळे, पोना / संदीप नलावडे, प्रकाश पाटील, सुशिल म्हस्के, पोशि/ सुरज थोरात, चापोशिक्र. / चिले, स्था. गु. अ. शाखा पोना / योगेश पाटील सांगली शहर पोलीस ठाणे, महिला सहा पोलीस निरीक्षक रुपाली बोचडे, सायबर पोलीस ठाणे. पोहेकों/ करण परदेशी, पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, सायवर पोलीस ठाणे.

अटक वेळ दिनांक दि.१९/०८/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

१) तौफीक सिकंदर जमादार, वय ३१ वर्षे, रा. मु. पो. उमळवाड, ता शिरोळ, जि. कोल्हापुर.
२) समीर धोडींबा मुलाणी, वय ३१ वर्षे, रा. मु. पो. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर,
३) दिपक पितांबर कांचळे, वय २७ वर्षे, रा मु. पो. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर.

उघड गुन्हे

१. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २५०/ २०२४ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०५(ए), ३३१(३), ३३१(४)

२. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २०५/२०२४, भा.द.वि.स. कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे

३. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. २०४/२०२४, भा.द.वि.स. कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे,

४. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ४१/ २०२४, भा.द.वि.स. कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे

५. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. १३९/ २०२४, भा.द.वि.स. कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे

६. शिरोळ पोलीस ठाणे, जिल्हा कोल्हापुर गु.र.नं. २५६ / २०२४ बी.एन.एस. २०२३ चे कलम कलम
૨૦૧(C), રૂફેક(૩), રૂરૂ૧(૪)

७. संजय नगर पोलीस ठाणे गु.र.नं. १५३/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम कलम ३०३,२) प्रमाणे

जप्त मुद्देमाल १. ३६,२५,०००/- रु. किंमतीचे एकूण ५१६ ग्रॅम वजनाचे दागिने त्यात सोन्याची धोरमाळ, मंगळसूत्र, चेन, गंठण, कर्णफुले, वेढण, झुबे, नेकलेस, असे किंमत चालु बाजार भावाप्रमाणे. . १,५९,६३०/- रु. किंमतीचे एकूण १६६५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने त्यात ताट, वाट्या, चमचे, २
मुर्ती, पंचमाळा, पैजंण असे किंमत चालु बाजार भावाप्रमाणे.
. ८०,०००/- रु. किंमतीची होण्डा कंपनीची काळया रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल जु.या. फिं. अं.
३८,६४,६३०/- (अडोतिस लाख चौसष्ठ हजार सहाशे तिस रुपये) गुन्हयाची थोडक्यात हकीकत

सांगली शहर परीसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने मा. वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देवून वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणं शाखेस घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दि. १९/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोना / संदीप नलावडे, पोहेकों अरुण पाटील यांना त्यांचे बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, इसम नामे तौफीक जमादार रा. उमळवाड, समीर मुलाणी रा. कुभोज आणि दिपक कांचळे रा. उमळवाड हे काळया रंगाची युनीकॉर्न मोटार सायकल क्र. एम एच ०९ ई एच ७११० वरुन चोरीचे सोने व चांदीचे दागिणे विक्री करण्यासाठी हरीपुर जुना रस्ता येथे येणार आहे.

नमुद पथक मिळाले चातमीप्रमाणे, हरीपुर जुना रस्ता परीसरात सापळा लावून थांचले असला, काळया रंगाच्या युनीकॉर्न मोटार सायकल क्रमांक एमएच ०१ ई एच ७११० घेवून लिन इसम येवून दिले. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे गांव विचारले असता त्यांनी त्यांची नाचे १) तौफीक सिकंदर जमादार, वय ३१ वर्षे, व्ययसाय मजुरी, रा. मु.पो. उमळवाड, ता शिरोळ, जि. कोल्हापुर २) समीर पोडींबा मुलाणी, वय ३१ वर्षे, व्यवसाय मेकॅनिक, रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर आणि ३) दिपक पितांबर कांबळे, वय २७ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा मु.पो. उमळवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर असे असल्याचे सांगितले. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यातील युनीकॉर्न मोटार सायकलला अडकवलेल्या पिशवीत चरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला. त्याचेकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याचाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता तौफिक जमादार याने सागितले की, त्याचा साथीदार समीर मुलाणी यांचे मालकीच्या स्प्लेण्डर मोटार सायकल क्र. एम एच ०९ ई एक्स ५०५२ वरुन माझा साथीदार समीर मुलाणी आणि दिपक कांबळे यांचेसोवत हरीपुर गावात सुमारे ६ महिन्यापासुन वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करुन चोरी मध्ये मिळालेले सोन्याचांदीचे दागिणे विक्री करणे करीता त्याने चार दिवसापूर्वी वारणालीमधून चोरी केलेल्या युनीकॉर्न मोटार सायकलवरुन दागिने विक्री करणेकरीता तो आला असल्याची कबूली दिली.

सदर बाबत सांगली ग्रामीण, संजयनगर व शिरोळ पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने व चोरीची मोटार सायकल पुढील तपास कामी पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त केले. तौफिक जमादार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेवर सांगली जिल्हयात घरफोडी चोरीचे, मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. समीर मुलाणी याचेवर सातारा जिल्हयात दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट