वायफळे येथील खूनाच्या गुन्हयातील इतर ३ आरोपी पुणे येथून ताब्यात..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :
पोलीस स्टेशन
तासगाव
अपराध क्र. आणि कलम
गु.र.नं. ५५९/२०२४ बी.एन.एस.
फिर्यादी नाव
कलम १०३ (१), १०९ (१), १८९ (२), १९१ (२), आर्म अॅक्ट ४. २५, २७
संजय दामू फाळके, रा वायफळे, ता तासगाव
गु.घ.ता. वेळ
गु.दा.ता. वेळ
माहिती कशी प्राप्त झाली
दिनांक १२/१२/२०२४ रोजी १८.०० वा.
दिनांक १३.१२.२०२४ रोजी
पोहेकों / दरिबा बंडगर पोहेकों / सागर टिंगरे
००.४९ वा.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, मा. सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगाव विभाग

यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोलीस निरीक्षक, सोमनाथ वाघ, तासगाव पोलीस ठाणे,
सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली
पोलीस उपनिरीक्षक, राजु अन्नछत्रे, तासगाव पोलीस ठाणे
स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील पोहवा / संदिप गुरव, नागेश खरात, सतिश माने, दरिया बंडगर, सागर लवटे, अमर नरळे, सागर टिंगरे, पोना/संदिप नलावडे, पोशि / प्रमोद साखरपे, तासगाव पो. ठाणेकडील पोह/ अमर सुर्यवंशी, पोना/ सुहास खुबेकर, विवेक यादव सायबर पो. ठाणे सांगली कडील पोशि कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे
गुन्हयातील मयत व जखमी
१. ओंकार ऊर्फ रोहित संजय फाकळे, रा वायफळे, ता तासगाव (मयत)
२. संजय दामू फाळके, यय ५५ वर्षे, रा वायफळे, ता तासगाव (जखमी)
३. जयश्री संजय फाळके, रा वायफळे, ता तासगाव (जखमी)
४. आशिष साठे, रा कुची, ता कवठेमहांकाळ (जखमी)
५. आदित्य साठे, रा कुची, ता कवठेमहांकाळ (जखमी)
६. सिकंदर शिकलगार, रा वायफळे, ता तासगाव (जखमी)
आरोपी अटक वेळ दिनांक दि. १६.१२.२०२४ रोजी
आरोपींचे नाव व पत्ता
१. आकाश महीपत मळेकर, वय २० वर्षे, रा पापळ वस्ती, विबेवाडी, जि पुणे
२. अनिकेत संतोष खुळे, वय १९ वर्षे, रा कात्रज, जि पुणे
३. विधिसंघर्षग्रस्त बालक
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. १२.१२.२०२४ रोजी वायफळे गावात सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके व त्याचे अनोळखी पाच ते सहा साथीदार यांनी वायफळे येथील ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके, वय २४ वर्षे, रा वायफळे याचा जुन्या भांडण्याचा व कोर्टातील केस माघे घेत नसल्याचा राग मनात धरून कोयता व तलवारीने शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला तसेच विशाल फाळके व त्यांचे साथीदार यांनी मिळून संजय दामू फाकळे, जयश्री फाळके, आशिष साठे, अदित्य साठे व सिकंदर शिकलगार यांचे शरीरावर कोयत्या व तलवारीने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेने वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी यातील गुन्हयातील इतर आरोपी निष्पन्न करून आरोपीचा शोध घेवून त्यांना अटक करणेबाबत आदेशित केले होते.
या गुन्हयामध्ये दिनांक १३.१२.२०२४ रोजी यातील मुख्य आरोपी विशाल सज्जन फाळके, पत्ता – पुणे मुळ रा. वायफळे, ता. तासगांव यास पुणे येथुन अटक करण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये या गुन्हयामधील इतर आरोपींना निष्पन्न करण्यात आले आहे. त्या निष्पन्न आरोपींना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकातील पोहेकों दरिया बंडगर व पोहेको सागर टिंगरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व त्यांचे पथकाने बिबवेवाडी (पुणे) पोलीस ठाणेकडील पोलीसांची मदत घेवून गुन्हयातील निष्पन्न आरोपी १) आकाश महीपत मळेकर, वय २० वर्षे, रा पापळ वस्ती, बिबेवाडी, जि पुणे २) अनिकेत संतोष खुळे, वय १९ वर्षे, रा कात्रज, जि पुणे ३) विधिसंघर्षग्रस्त बालक यांना बिबवेवाडी, पुणे येथील ओटा गॅस गोडावून येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी मुख्य अटक आरोपी विशाल सज्जन फाळके हा त्यांचा मित्र असल्याने त्याचे सांगणेवरून वायफळे, ता तासगाव येथे येवून हत्याराने मारहाण केलेचे कबुल केले आहे.
लागलीच सदर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगाव विभाग हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com